श्रीसूक्ताच्या पहिल्या ऋचेचा अर्थ - भाग ५ (The Meaning Of The First Rucha Of Shree Suktam-Part 5) सुखाची साधने म्हणजे सुख नव्हे. पवित्र मार्गाने परिश्रम करून सुखाची साधने मिळवणे हाच अर्थ पुरुषार्थ सिद्ध करण्याचा राजमार्ग आहे. अपवित्र मार्गाने मिळवलेली प्रत्येक गोष्ट ही अलक्ष्मीकडून आलेली असते. सदैव श्रद्धावान राहून पुरुषार्थ करणार्यालाच लक्ष्मी आणि अलक्ष्मी यांतील फरक कळू शकतो. जातवेदच श्रीमातेला माझ्या जीवनात आणणारा आहे, हा विश्वास ही ऋचा आमच्या मनात निर्माण करते. श्रीसूक्ताच्या पहिल्या ऋचेच्या अर्थाबद्दल सद्गुरु श्रीअनिरुद्धांनी त्यांच्या १६ एप्रिल २०१५ रोजीच्या प्रवचनात जे सांगितले, ते आपण या व्हिडियोत पाहू शकता.
॥ हरि ॐ ॥ ॥ श्रीराम ॥ ॥ अंबज्ञ ॥