श्रीसूक्ताच्या पहिल्या ऋचेचा अर्थ - भाग ४ (The Meaning Of The First Rucha Of Shree-Sooktam - Part 4) श्रीमातेला घेऊन येण्यासाठी ब्रह्मवादिनी लोपामुद्रा जातवेदास श्रीसूक्ताच्या पहिल्या ऋचेत आवाहन करते. ती स्पष्टपणे म्हणते की माझ्या जातवेदा, माझ्यासाठी माझ्या श्रीमातेला घेऊन ये. ‘माझ्याशी निगडित प्रत्येक क्षेत्रात श्रीमातेला घेऊन ये’, असे येथे जातवेदास प्रार्थिले आहे. हे या ब्रह्मवादिनीच्या अपौरुषेय रचनेचे सौंदर्य आहे. श्रीसूक्ताच्या पहिल्या ऋचेच्या (Rucha) अर्थाबद्दल सद्गुरु श्रीअनिरुद्धांनी त्यांच्या १६ एप्रिल २०१५ रोजीच्या प्रवचनात जे सांगितले, ते आपण या व्हिडियोत पाहू शकता.
॥ हरि ॐ ॥ ॥ श्रीराम ॥ ॥ अंबज्ञ ॥