गुरुपौर्णिमा - १ ( Gurupournima 1)
काल आपण गुरुपौर्णिमा उत्सव साजरा केला. सद्गुरू बापूंच (अनिरुध्दसिंह) दर्शन घेताना प्रत्येक भक्ताच्या चेहऱ्यावरचा आनंद ओसंडून वाहत होता. सद्गुरूंच्या चरणी अढळ विश्वास कसा असावा ही दाखवणारी स्टेजची मांडणी खूपच वेधक होती. " एक विश्वास असावा पुरता | कर्ता हर्ता गुरु ऐसा || ही श्री साई सत चारितातील १९ व्या अध्यायातील ओवी इतक्या सहजतेने पटवणारी मांडणी भक्तांच लक्ष वेधून घेत होती. ही ओवी आपल्या मनात स्थिर करण्याच हे वर्ष आहे हे बापुंनी आपणा सर्वांना सांगितलेच आहे. आपणही असाच विश्वास सद्गुरू चरणी ठेवूया मग तो " रेखेवर मेख मारणारच आहे". आपण आपलं काम करूया तो त्याच काम करतोच.