....आणि आत्मबलच्या आठवणी पुन्हा जाग्या झाल्या...
कालच या महोत्सवाची डीव्हीडी लॉच झाली. १९ ऑगस्टला संध्याकाळी ताईच्या हातून या डीव्हीडीचे अनावरण झाले. ताईने बळ दिलेल्या राजहंसामधून ही डीव्हीडी बाहेर आली. ह्या डीव्हीडीचे उदघाटन करुन सर्व डीव्हीडींच्या बॉक्सेसमध्ये ताईने उदी टाकली. मग ह्या डीव्हीडी सर्वांना उपलब्ध करून देण्यात आल्या. आत्मबलच्या सर्व सख्यांनी डीव्हीडी घेण्यासाठी एकच झुंबड घातली. डीव्हीडी घेताना प्रत्येकीच्या चेहर्यावर समाधान होते. खरच हा नंदाई-लेकींचा महोत्सव बघण्यासारखा होता.
रविवारच्या ह्या कार्यक्रमात नंदाईने अमूल्य मार्गदर्शन केले. आपल्या लेकींना गुणसंकीर्तनाचे महत्व पटवून दिले. यासाठी श्री. गौरांगसिंह वागळे यांचे गुणसंकिर्तन कसे करावे? याचे दीड तासाचे लेक्चर ठेवले. ताईने तिच्या लेकींना २६ ऑगस्टला गोविद्यापिठम्, कर्जत होणार्या मेगा वृक्षारोपण सेवेला मोठया संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले. ताईने २० ते २५ मिनीटे लेकींशी हितगुज केले. त्यानंतर डीव्हीडीमधील अर्ध्या तासाचा भाग सगळ्यांना दाखवण्यात आला. खरच सार्यांच्याच आठवणी पुन्हा जाग्या झाल्या. डोळे भरुन आले होते.. आणि अशातच नंदाईने एक सुंदर गोष्ट सांगितली.
आत्मबल महोत्सवाचे फेसबुक पेज ऑक्टोबरमध्ये लॉच केले होते आणि पेजला इतका चांगला रिसपॉन्स आला की खुद्द फेसबुक कंपनीने याची दखल घेतली. त्या संदर्भात स्वीडनवरुन आलेले पत्र ताईने सर्वांना दाखविले. आणि तेव्हा ताई म्हणाली.... Now Aatmabal has become global.खरच सांगतो यावेळी सार्यांचा ऊर अभिमानाने भरुन आला होता. श्रीराम... ताईने फेसबुक म्हणजेच सोशल मिडीयाचे महत्व सांगितले. आज भारतामधील मिडीया, महत्वाचे न्यूजपेपर्स, न्यूज चॅनल्स यांचे स्वतःचे फेसबुक पेज आहे. यावरुनच फेसबुक माहित असणे, वापरता येणे ही काळाची गरज आहे. ताईने तिच्या लेकींना याची जाणीव करुन दिली व आत्मबल महोत्सव पेजवर ह्या कार्यक्रमाचे अपडेट पाहण्यास मिळतील असे सांगितले.
आत्मबलच्या या सार्या प्रवासात बापूंची साथ कायम ताईबरोबर होती आणि आहेच. बापू (अनिरुद्धसिंह) देखील स्वतः सुरुवातीला आत्मबलमध्ये शिकवायचे. आज आत्मबलची नवी म्हणजेच १४ वी बॅच सुरु झाली आहे. नंदाईच्या नव्या तपाला सुरुवात झाली आहे... नंदाई आणि तिच्या लेकींच्या उत्सवाची नव्याने सुरुवात होत आहे...
ll हरि ॐ ll