वैशाख पौर्णिमा उपासना

१)  प्रथम चौरंग किंवा पाट घेऊन त्यावर शाल किंवा तत्सम वस्त्र घालावे. त्यावर आपल्या सद्गुरुचा व हनुमंताचा फोटो ठेवावा

 

२)  सद्गुरुच्या फोटोस सुगंधित किंवा प्राप्त फुलांचा हार घालावा, तर हनुमंताच्या फोटोस रुईच्या पानांचा हार घालावा.

 

३)  दीप व अगरबत्ती लावून हात जोडावे व सद्गुरुंचे आणि हनुमंताचे ध्यान करावे.

 

४)  त्यानंतर खालीलपैकी कोणतेही एक स्तोत्र ११ वेळा म्हणावे.

    १. ११ वेळा क्लेशनिवारक श्रीअनिरुद्धकवच

    २. ११ वेळा श्रीहनुमान चलीसा

    ३. ११ वेळा श्रीअनिरुद्ध चलीसा

    ४. ११ वेळा त्रिविक्रमाची १८ वचने

    ५. ११ वेळा सद्गुरु श्रीसाईनाथांची ११ वचने

    ६. ११ वेळा श्रीआदिमाता शुभंकरा स्तवन

    ७. ११ वेळा श्रीआदिमाता अशुभनाशिनी स्तवन

    ८. ११ वेळा श्रीहनुमान स्तोत्र (भीमरूपी महारुद्रा...)

    ९. ११ वेळा श्रीपंचमुखहनुमत्कवच

 

त्यानंतर....

     १) आंब्याचं पन्ह,

     २) कच्चा आंबा व भिजलेली चण्याची डाळ वाटून त्यांचा प्रसाद अर्पण करावा.

मग लोटांगण घालावे.  वृद्धांनी केवळ उभ्याने नमस्कार केला तरी तो देवाला पोहचतो.

ब्राह्ममुहूर्तावर उपासना करणे शक्य न झाल्यास दिवसभरात केली तरी चालेल. जो कोणी प्रेमाने वैशाख पौणिमेला ही उपासना करेल त्याच्या घरी ह्या दिवशी आपला सद्गुरु श्रीहनुमंताबरोबर येऊन जातोच अशी ग्वाही सद्गुरु श्रीअनिरुद्धांनी दिली आहे.

वैशाख पूर्णिमा उपासना - हिंदी

Vaishakha Pournima Upasana