श्रीश्वासम्‌ गुह्यसूक्तम्‌ ( The ShreeShwasam The Guhyasuktam )

श्रीश्वासम्‌ गुह्यसूक्तम्‌ (The ShreeShwasam The Guhyasuktam)
श्रीश्वासम्‌ गुह्यसूक्तम्‌ (The ShreeShwasam The Guhyasuktam)

 

हरि ॐ. अरुला ही ह्या विश्‍वातील सर्वोच्च व सर्वोत्कृष्ट ’निरोगीकरण शक्ती’ आहे (The Healing Power). सर्व दु:खाना दूर करणारी ही अरुला अक्षरश: तिष्ठत असते मानवांनी तिला स्वीकारावे म्हणून. ह्या निरोगीकरणासाठीची शृंखला ‘श्रीश्वासम्‌ गुह्यसूक्ता’त आदिमातेने व्यवस्थित तयार करुन ठेवलेली आहे.

श्रीहरिगुरुग्राम येथे सध्या सुरु असलेल्या श्रीश्वाम्‌ उत्सवादरम्यान आलेल्या श्रध्दावानांना हे गुह्यसूक्तम्‌, श्रीपंचमुखी हनुमंत व श्रीअश्विनी कुमारांचे दर्शन घेताना ऎकायला मिळत आहे. श्रध्दावान शांतचित्ताने व प्रेमपूर्वक विश्‍वासाने हे ऎकून गुह्यसूक्ताचा निस्सीम आनंद लुटत आहेत व त्यातील मोठ्याआईचे प्रेम, अकारण कारुण्य व क्षमा अनुभवत आहेत.

उत्सवादरम्यानच नव्हे तर हे गुह्यसूक्तम्‌ श्रध्दावान आपल्या घरी शांतपणे ऎकू शक्तात. उत्सवस्थळी जरी मराठी भाषेतील गुह्यसूक्तम्‌ श्रध्दावानांना ऎकावयास उपलब्ध असले तरी, जास्तीतजास्त श्रध्दावानांना हे गुह्यसूक्त त्यांना श्रृत असलेल्या भाषांमध्ये ऎकून त्याचा आनंद घेता यावा यासाठी गुह्यसूक्तम्‌च्या सी.डी. मराठी, हिंदी, इंग्रजी व गुजराती भाषेत उपलब्ध आहेत. शिवाय संस्कृत भाषेताल सी.डी. देखील लवकरच उपलब्ध होतील. जेव्हा-जेव्हा श्रध्दावानांना शांतीची, आधाराची आवश्यकता भासेल त्या-त्या वेळेस श्रध्दावान आनंदाने हे गुह्यसूक्तम्‌ ऎकून त्यातील प्रसन्‍न करणारी शांति, आधार अनुभवू शकतील. ह्याच हेतूने इतक्या भाषांमध्ये गुह्यसूक्तम्‌ची सी.डी. उपलब्ध करुन देण्यात येत आहे. (श्रध्दावान गुह्यसूक्तम्‌ ऎकत करत असलेल्या परिक्रमेचा एक छोटासा व्हिडीयो येथे देत आहोत).

॥ हरि ॐ ॥ ॥ श्रीराम ॥ ॥ अंबज्ञ ॥