श्रीसीतारामचन्द्रो देवता - २ ( Shree Sita Ramchandro Devata - २) - Aniruddha Bapu Marathi Discourse 21 October 2004
रामरक्षा हे केवळ एक स्तोत्र नसून स्तोत्र-मन्त्र आहे. स्तोत्र मानवाला जागृत करते आणि मन्त्र हा तर खजिना आहे.( Sita ) सीता ही या रामरक्षेची मन्त्रशक्ती आहे आणि सीतेसहित राम म्हणजेच रामचन्द्र हा या रामरक्षेचा अधिष्ठाता आहे. श्रीसीतारामचन्द्र म्हणजेच सीतेसहित राम ही या स्तोत्रमन्त्राची देवता (श्रीसीतारामचन्द्रो देवता) आहे, हे सांगण्यात बुधकौशिक ऋषिंचा काय भाव आहे, याबाबत परम पूज्य सद्गुरु श्री अनिरुद्ध बापुंनी गुरूवार दिनांक २१ ऑक्टोबर २००४ रोजीच्या प्रवचनात मार्गदर्शन केले, जे आपण या व्हिडियोत पाहू शकता.
॥ हरि ॐ ॥ ॥ श्रीराम ॥ ॥ अंबज्ञ ॥