श्रवणातूनच माणूस बोलायला शिकतो. भक्तिमार्गातसुद्धा श्रवणभक्ती कमी असलेला मुका होतो म्हणजेच जो भगवंताचे नाम-लीला-गुणसंकीर्तन श्रवण करत नाही, त्याची भक्ती कमी होते. श्रवणापासून सुरू होणारा हा नामयज्ञ प्रत्येक श्वासाबरोबर व्हायला हवा. शेकोटी आणि यज्ञ यात जो फरक आहे, तोच फरक माणूस नेहमी करतो तो श्वासोच्छ्वास आणि सहज प्राणायाम यात आहे. सहज प्राणायाम हाच यज्ञ कसा आहे याबद्दल परम पूज्य सद्गुरु श्रीअनिरुद्धांनी त्यांच्या ३१ मार्च २००५ रोजीच्या प्रवचनात सांगितले, जे आपण या व्हिडियोत पाहू शकता.
॥ हरि ॐ ॥ ॥ श्रीराम ॥ ॥ अंबज्ञ ॥