मानवाच्या भालस्थानी आज्ञाचक्र आहे आणि या आज्ञाचक्राचा स्वामी रामदूत महाप्राण हनुमंत आहे. ज्या मानवाच्या जीवनात राम राजा असतो, त्याच्या जीवनात हनुमंत सक्रिय असतो आणि तो श्रद्धावानाच्या आज्ञाचक्राचे संरक्षण करतो. स्वत: राम त्याचा आज्ञांकित असणार्या दासाची कधीही उपेक्षा न करता त्याचे संरक्षण करतोच. भालप्रदेशाचे संरक्षण रामाने करावे या रामरक्षेतील प्रार्थनेबद्द्ल परम पूज्य सद्गुरु श्री अनिरुद्ध बापुंनी त्यांच्या १० मार्च २००५ रोजीच्या प्रवचनात सांगितले, जे आपण या व्हिडियोत पाहू शकता.
॥ हरि ॐ ॥ ॥ श्रीराम ॥ ॥ अंबज्ञ ॥