मानवाची अधोगती होऊ नये म्हणून सद्गुरुतत्त्वाची आज्ञा पाळणे महत्त्वाचे आहे आणि त्यासाठी श्रवणभक्ती करणे आवश्यक आहे. विश्वाचे अमित्र बनणे म्हणजे भगवंताच्या आणि माझ्या आड माझा अहंकार, आसक्ती आदिंना येऊ न देणे आणि भगवंताशी सख्य करणे. जो अशा प्रकारे आचरण करतो, त्या श्रद्धावानाच्या जीवनात विश्वामित्रप्रिय राम त्याच्या श्रुतीचे रक्षण कसे करतो, याबद्दल परम पूज्य सद्गुरु श्री अनिरुद्ध बापुंनी त्यांच्या २४ मार्च २००५ रोजीच्या प्रवचनात सांगितले, जे आपण या व्हिडियोत पाहू शकता.
॥ हरि ॐ ॥ ॥ श्रीराम ॥ ॥ अंबज्ञ ॥