श्रीसूक्ताच्या पहिल्या ऋचेचा अर्थ - भाग १० (The Meaning Of The First Rucha Of Shree Suktam - Part 10) - Aniruddha Bapu Marathi Discourse 16 April 2015
श्रीसूक्ताच्या पहिल्या ऋचेचा अर्थ - भाग १० (The Meaning Of The First Rucha Of Shree Suktam - Part 10) जिच्या केवळ उपस्थितीतून तेज प्रकटते अशा हिरण्यवर्णा श्रीमातेला श्रीसूक्ताच्या पहिल्या ऋचेत आवाहन केले आहे. जिचा प्रभाव सदैव वाढतच राहतो अशा श्रीमातेच्या उपस्थितीमुळे माझे भलेच होणार आहे, हा श्रद्धावानाचा भाव असतो. लोपामुद्रेने म्हणूनच पहिला शब्द ‘हिरण्यवर्णा’ असा योजला आहे. सर्व रोग, आधिव्याधि, संकटे, पीडा यांचे हरण करणारी, दुष्प्रारब्धाचे हरण करणार्या आदिमाता चण्डिकेला ‘हरिणी’ म्हटले आहे. श्रीसूक्ताच्या पहिल्या ऋचेच्या अर्थाबद्दल सद्गुरु श्रीअनिरुद्धांनी त्यांच्या १६ एप्रिल २०१५ रोजीच्या प्रवचनात जे सांगितले, ते आपण या व्हिडियोत पाहू शकता.
॥ हरि ॐ ॥ ॥ श्रीराम ॥ ॥ अंबज्ञ ॥