श्रीयन्त्रकूर्मपीठम् (Shreeyantrakurmapeetham)

श्रीयन्त्रकूर्मपीठम् (Shreeyantrakurmapeetham)
श्रीश्वासम् उत्सवामध्ये सद्गुरु श्री अनिरुध्द बापूंच्या निर्देशानुसार श्रध्दावान ’श्रीयन्त्रकूर्मपीठम्’ चे दर्शन घेऊ शकतात. ’कूर्म’ हा महाविष्णुच्या दहा अवतारांपैकी दुसरा अवतार मानला जातो. समुद्रमंथनाच्या वेळी महाविष्णुने कूर्मावतार धारण केला, याबद्दल बापूंनी प्रवचनातून सांगितलेच आहे. कूर्मावताराच्या पाठीवरील श्रीयन्त्रास ’श्रीयन्त्रकूर्मपीठम्’ म्हटले जाते व याचे दर्शन घेणे अत्यंत पवित्र व श्रेष्ठ मानले जाते. सद्गुरु श्री अनिरुध्द बापूंच्या निवासस्थानी असणारे असे हे ’श्रीयन्त्रकूर्मपीठम्’ श्रीश्वासम् उत्सवात मुख्य मंचावर (स्टेजवर) श्री आदिमाता चण्डिकेच्या चरणांजवळ विराजमान आहे. त्याचीच तसबीर मंचासमोरील स्थानाची परिक्रमा पूर्ण करताना श्रध्दावान पाहू शकतात.

॥ हरि ॐ ।। श्रीराम ।। अंबज्ञ ॥