परीक्षेमध्ये ज्याप्रमाणे आधी जे प्रश्न सोपे आहेत ते सोडवले पाहिजेत, त्याप्रमाणे परमार्थातही सर्वांत सहजसोप्या असणार्या अशा रामनामापासून सुरुवात केली पाहिजे. हे सहज नाम म्हणजेच रामनाम घेता घेता सहजपणे सहज प्राणायाम घडेल आणि त्यातून रामनाम अधिक दृढ होईल. सहजनाम असणार्या रामनामाबद्दल आणि रामनामामुळे मिळणार्या सहजलाभांबद्दल परम पूज्य सद्गुरु श्रीअनिरुद्धांनी त्यांच्या ३१ मार्च २००५ रोजीच्या प्रवचनात सांगितले, जे आपण या व्हिडियोत पाहू शकता.
॥ हरि ॐ ॥ ॥ श्रीराम ॥ ॥ अंबज्ञ ॥