पडत्या फळाची आज्ञा (Explanation of a Proverb- Padatya Phalachi Aadnya) - Aniruddha Bapu Marathi Discourse 05 November 2009

सीतेचा शोध घेणार्‍या हनुमंताची अशोकवनात सीतेची भेट झाली. त्यावेळी हनुमंताने भूक लागल्याचे सीतेला सांगितल्यावर सीतेने त्याला फक्त झाडावरून खाली पडणारी किंवा खाली पडलेली फळे खाण्याची आज्ञा केली. म्हणून हनुमानाने सगळी झाडं गदागदा हलवून फळं खाली पाडली आणि खाल्ली. या प्रसंगावरून 'पडत्या फळाची आज्ञा' ही म्हण प्रचलित झाली आहे, असे परम पूज्य सद्गुरु श्रीअनिरुद्धांनी आपल्या दि. 05 नोव्हेंबर 2009 रोजी च्या मराठी प्रवचनात श्री हरिगुरुग्राम येथे सांगितले, जे आपण या व्हिडियोत पाहू शकता.

॥ हरि ॐ ॥ ॥ श्रीराम ॥ ॥ अंबज्ञ ॥