हेमाडपंतांच्या मनात शिरडीत असताना एकदा एका गुरुवारी `दिवसभर रामनाम घ्यावे’ हा भाव आदल्या दिवशी दृढतेने दाटला आणि साईनाथांनी आपल्या भक्ताच्या त्या पवित्र संकल्पाला सत्यात कसे उतरवले, हे आपण श्रीसाईसच्चरितात वाचतो. जेव्हा मी भगवंताच्या प्रेमाने पवित्र संकल्प करतो, तेव्हा तो भगवंत त्या संकल्पास सत्यात कसा उतरवतो हेच यावरून लक्षात येते. भगवंत तर हे करण्यास तत्पर आणि समर्थच असतो, श्रद्धावानाने भगवंताच्या आणि त्याच्या आड कशालाही येऊ न देण्याबाबत दक्ष रहायला हवे, याबद्दल परम पूज्य सद्गुरु श्री अनिरुद्ध बापुंनी त्यांच्या २४ मार्च २००५ रोजीच्या प्रवचनात मार्गदर्शन केले, जे आपण या व्हिडियोत पाहू शकता.
॥ हरि ॐ ॥ ॥ श्रीराम ॥ ॥ अंबज्ञ ॥