The English translation of Karunatripadi Stotra

हिंदी मराठी ગુજરાતી বাংলা ಕನ್ನಡ తెలుగు മലയാളം
शांत हो श्रीगुरूदत्ता । मम चित्ता शमवी आता ॥धृ.॥
Shant ho Shreegurudatta. Mama chitta shamavi ata.
हे श्रीगुरुदत्ता, तू सदैव शांतच असतोस. तुला क्रोध येणे संभवतच नाही. पण भक्तांच्या हितासाठी तू जो क्रोध धारण केला आहेस, त्यामुळे मला भिती वाटते आहे रे. हे श्रीगुरुराया, माझ्या मनातील भिती शांत कर. माझे चित्त जे भयाने, भितीने, अस्थैर्याने व असुरक्षिततेने ग्रासले गेले आहे ते शांत कर, या सर्वांचे शमन कर.
O Shri Gurudatta, You are ever calm and serene. It is not possible for You to be angry.
Yet, the anger You have assumed for the welfare of Your devotees fills me with fear.
O Shri Gururaya, please calm the fear in my mind.
Soothe my mind, which has been seized by dread, fear, restlessness, and a sense of insecurity; quell all of these completely.
तू केवळ माताजनिता । सर्वथा तू हितकर्ता ।
तू आप्तस्वजन भ्राता । सर्वथा तूचि त्राता ॥
भयकर्ता तू भयहर्ता । दंडधर्ता तू परिपाता ।
तुजवाचुनि न दुजी वार्ता । तू आर्ता आश्रय दाता ॥१॥
Tu keval matajanita. Sarvatha tu hitakarta.
Tu aapta-svajan bhrata. Sarvatha tuchi trata.
Bhayakarta tu bhayaharta. Dandadharta tu paripata.
Tujvachuni na duji varta. Tu arta aashraya data. (1)
हे श्रीगुरुराया, केवळ तूच माझा मायबाप आहेस, म्हणजेच मला जन्माला घालणारा व माझे पालनपोषण करणाराही तूच आहेत. तूच माझे सर्वार्थाने हित करणारा आहेस. तूच माझा खरा आप्त आहेस, तूच माझा सगासोयरा, माझा भाऊही आहेस. तूच माझे सर्वस्वी रक्षण करणारा आहेस.
आमच्या कल्याणासाठी प्रसंगी भय निर्माण करणारा, आम्हाला भय दाखविणारा तूच आहेस आणि भय हरणाराही तूच आहेस व त्यासाठीच तू हाती दंड धारण केला आहेस आणि शिक्षेतून वाचविणारा, क्षमा करणाराही तूच आहेस. तुझ्याशिवाय इतर कुणीही माझा नाही आणि तुझ्याशिवाय दुसरे काही मला ठाऊक नाही. माझ्यासारख्या दु:खी-कष्टी पीडितांचा, संकटग्रस्तांचा आश्रयदाता तूच आहेस. हे श्रीगुरुदत्ता, तूच आम्हा आर्तांचा एकमेव आश्रयकर्ता आहेस.
O Shri Gururaya, You alone are my mother and father, means You are the One who has given me birth, and You are the One who nurtures me.
You alone are the One who works for my welfare in every way.
You alone are my true loving kin, my family, my very own brother.
You alone are the One who protects me completely.
For our welfare, it is You who, at times, instills fear and shows us the face of dread and it is You alone who removes that fear. It is for this very purpose that You wield the staff in Your hand.
You alone are the One who saves us from punishment and forgives us.
Apart from You, no one else is mine, and apart from You, I know nothing else.
You alone are the refuge for the sorrowful, the afflicted, and those in adversity like me.
O Shri Gurudatta, You alone are the one and only refuge for us, the distressed.
अपराधास्तव गुरूनाथा । जरि दंडा धरिसी यथार्था ।
तरी आम्ही गाउनि गाथा । तव चरणीं नमवू माथा ॥
तू तथापि दंडिसी देवा । कोणाचा मग करू धावा? ।
सोडविता दुसरा तेंव्हा । कोण दत्ता आम्हा त्राता? ॥२॥
Aparadhastava Gurunatha. Jari danda dharisi yathartha.
Tari amhi gauni gatha. Tava charani namavu matha.
Tu tathapi dandisi deva. Konacha mag karu dhava?
Sodvita dusara tenva. Kon Datta amha trata? (2)
हे श्रीगुरुनाथा! आमच्या अपराधांना, दुर्वर्तनांना, पापांना शिक्षा करण्यासाठी म्हणजेच आमचे कल्याण करण्याच्या हेतूने तू हातात दंड धारण केला आहेस. हे जरी योग्य असले, तरी अपराधी आम्ही तुझे नामसंकिर्तन करून, तुझ्या चरित्राचे, लीलांचे गुणगान करून तुझ्या चरणी नतमस्तक होऊन तुला शरण आलो आहोत.
तरीही जर का देवा तू आम्हाला दंडित केलेस, तर मग आम्ही, तुझ्या लेकरांनी कुणाचा बरे धावा करावा? हे श्रीगुरुदत्ता! तुझ्याशिवाय आम्हाला अपराधांतून, दु:खकष्टातून, यातनांतून सोडवणारा आमचा रक्षणकर्ता दुसरा कोण बरं आहे? कुणीही नाही.
O Shri Gurunatha! In order to punish our offenses, misdeeds, and sins that is, with the very intent of bringing about our welfare, You have assumed the staff in Your hand. Though this is indeed just, we, the culprits, have come to surrender at Your lotus feet bowing before You in reverence by singing the glories of Your Naam, singing the glories of Your life and leelas.
Yet, O Almighty, if You still choose to punish us, then tell me to whom else should we, Your children, run to for refuge?
O Shri Gurudatta! Other than You, who else is our protector to free us from our offenses, our hardships and sufferings, and our afflictions?
There is no one, none at all.
तू नटसा होउनि कोपी । दंडितांहि आम्ही पापी ।
पुनरपिही चुकत तथापि । आम्हांवरि नच संतापी ॥
गच्छतः स्खलनं क्वापि । असे मानुनि नच हो कोपी ।
निज कृपालेशा ओपी । आम्हांवरि तू भगवंता ॥३॥
Tu natasa houni kopi. Danditahi amhi papi.
Punarapihi chukat tathapi. Amhanvari nach santapi.
Gachchhatah skhalanam kvapi. Ase manuni nach ho kopi.
Nija krupalesha opi. Amhanvari tu Bhagavanta. (3)
खरं तर तू कधीच तुझ्या लेकरांवर कोपत नाहीस. एखाद्या नटाप्रमाणे आमच्या कल्याणासाठी तू रागावल्याचा अभिनय करत आहेस. त्या नटासारखाच क्रोध धारण करून तू आम्हा पापी जीवांना शिक्षा करतोस. तरीही न सुधारलेले आम्ही अज्ञानी पुन्हा पुन्हा त्याच चुका करीत राहतो. म्हणूनच हे श्रीगुरुदत्ता, आम्ही तुझी प्रार्थना करतो की तू आमच्यावर संतापू नकोस.
‘गच्छतः स्खलनं क्वापि’ म्हणजे वाटेवरून चालणारा माणूसच ज्याप्रमाणे चालताना कधी कधी घसरून पडू शकतो, त्याप्रमाणे आमच्याकडून कर्मे करताना चुका होऊ शकतात आणि होतातही, हे जाणून तू आमच्यावर कोपित होऊ नकोस. हे भगवन्! तुझ्या कृपेचा आम्हांवर वर्षाव कर, कारण तुझ्या कृपेचा लवलेशही आमचा उद्धार करण्यास समर्थ आहे.
In reality, you never get angry with your children. Like an actor, for the sake of our welfare, You only pretend to be angry.
Just like that actor, You assume anger and punish us, we who are but sinful beings. Yet, we, the ignorant, who do not improve, keep making the same mistakes again and again.
That is why, O Shri Gurudatta, we pray that you do not get angry with us.
“Gacchataḥ skhalanam kvāpi” — just as a person walking on the road can sometimes slip and fall, we too can and indeed do make mistakes while performing our actions (karmas). Knowing this, please do not be angry with us. O Bhagwan! Shower us with your grace, because even the smallest trace of your grace is powerful enough to uplift us.
तव पदरी असता ताता । आडमार्गी पाऊल पडतां ।
सांभाळुनि मार्गावरता । आणिता न दुजा त्राता ।।
निज बिरुदा आणुनि चित्ता । तू पतीतपावन दत्ता ।
वळे आता आम्हांवरता । करुणाघन तू गुरूदत्ता ॥४॥
Tava padari astata tata. Aadmargi paaul padta.
Sambhaluni margavarta. Aanita na duja trata.
Nija biruda aanuni chitta. Tu patitapavan Datta.
Vale ata amhanvarta. Karunaghan tu Gurudatta. (4)
हे भक्तपित्या श्रीगुरु दत्तात्रेया! तुझ्या चरणकमलांचा आश्रय घेतल्यावर जर आमचं पाऊल आडमार्गावर पडलं म्हणजेच आम्ही चूकीचे वागलो तरीही तुम्ही आम्हाला सांभाळून सुखरूप पुन्हा योग्य मार्गावर आणता. असा आमचा दुसरा कोणीही तारणहार नाही.
हे पतितपावना श्रीगुरुदत्ता, करुणाघना तुझ्या या ब्रीदाला चित्तात धारण करून आमच्यावर तुझी कृपा अखंड बरसत ठेव.
O Father of devotees, Shri Guru Dattatreya!
Even after taking refuge at your lotus feet, our steps stray onto the wrong path, in other words, even if we act wrongly, You still protect us and safely bring us back onto the right path. We have no other saviour like You.
O saviour of the fallen, Shri Gurudatta, the Ocean of Compassion, holding this sacred vow of Yours in the heart, keep showering Your grace upon us unceasingly.
सहकुटुंब सहपरिवार । दास आम्ही हे घरदार ।
तव पदीं अर्पू असार । संसाराहित हा भार ।
परिहारिसी करुणासिंधो । तू दीनानाथ सुबंधो ।
आम्हा अघलेश न बाधो । वासुदेवप्रार्थित दत्ता ॥५॥
Sahakutumb sahaparivar. Daas amhi he gharadar.
Tava padi arpu asar. Sansarahit ha bhar.
Pariharisi karunasindho. Tu dinanath subandho.
Amha aghalesha na badho. Vasudevaprarhit Datta. (5)
श्रीगुरु दत्तात्रेया, आम्ही सहकुटुंब, सहपरिवार तुझेच दास आहोत. या नश्वर व क्षणभंगुर संसाराची, घरदाराची आसक्ती, आमची कर्म म्हणजेच आमच्या समग्र विकासाच्या आड येणारा भार आहे, जो आमचे अहित करणारा आहे. आमचा ’हा’ सारा भार आम्ही तुझ्या चरणी अर्पण करत आहोत.
हे गुरुराया! हे करुणेच्या सागरा! तू आम्हां दीनांचा नाथ आहेस, आमचा हितचिंतक आहेस. तू आमच्या सार्या दु:ख-क्लेशांचा, दुष्प्रारब्धाचा, अनुचिताचा समूळ परिहार करतोस. हे दत्तात्रेया! तुझ्या सेवेत आमच्या पापांची अंशमात्रसुद्धा बाधा होऊ देऊ नकोस अशी मी वासुदेव (परमपूज्य परमहंस परिव्राजकाचार्य श्रीवासुदेवानन्दसरस्वतीस्वामी) आपल्याला प्रार्थना करीत आहे.
Shri Gurudattatreya, we, with our family and kin, are your Daas (servers at your lotus feet). The attachment to this perishable and fleeting worldly life and to our home and possessions, along with our actions, is a burden that hinders our complete development and causes us harm.
We offer this entire burden at Your lotus feet.
O Gururaya! O ocean of compassion! You are our Master, we the helpless, and our well-wisher. You remove entirely all our sorrows and sufferings, our ill-fate, and all that is unrighteous. O Dattatreya! I, Vasudeva (Param Pujya Paramhansa Parivrajakacharya Shree Vasudevananda Saraswati Swami), pray to You that let not even the slightest trace of our sins become an obstacle in our service unto You.