करुणात्रिपदीचा महिमा व आजच्या काळात म्हणण्याची आवश्यकता

आज सर्वत्र जागतिक स्तरावर तसेच वैयक्तिक पातळीवर प्रचंड प्रमाणात अस्थैर्य जाणवत आहे. काही दिवसांपूर्वी बांगलादेश व श्रीलंकेमध्ये अराजकता माजलेली आपण पाहिली. तीच परिस्थिती आज नेपाळमध्येही आपण बघत आहोत.
इस्त्राईल व ईराण मधील संघर्षाची परिणीती कशात झाली ते आपण बघितले आणि आजही गाझापट्टीमध्ये इस्त्राईल व हमास यांच्यामधील संघर्ष सुरूच आहे. भारताच्या ऑपरेशन सिंदुरने पाकिस्तानला गुडघ्यावर आणलेली गोष्टही आपण अनुभवली. नुकतेच फ्रांसचे सरकार कोसळले. जपानच्या पंतप्रधानांना राजीनामा द्यावा लागला. थायलंड आणि कंबोडीयाच्या युद्धसदृश परिस्थितीत थायलंडच्या पंतप्रधानांना पदच्युत करण्याची वेळ आली. तसेच नुकतीच अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचे समर्थक चार्ली कर्क यांच्या अकस्मित हत्येची बातमी आपण बघितली.
म्हणजेच जागतिक व वैयक्तिक पातळीवरही पसरलेले प्रचंड अस्थैर्य व अशांतता सध्या आपण सगळेच अनुभवत आहोत. म्हणून या व येणार्याप काळामध्ये वैयक्तिक व देशाच्या स्थैर्य व शांतीकरिता सद्गुरु श्रीअनिरुद्धांनी सर्व श्रद्धावानांना श्रीवासुदेवानंदसरस्वती लिखीत करूणात्रिपदी ऐकण्यास व वाचण्यास सांगितले आहे. या काळात ही करूणात्रिपदी ऐकणे आणि वाचणे हे अत्यंत श्रेयस्कर असेल. जशी हनुमान चलिसा हिंदीमध्ये, दत्तबावनी गुजरातीमध्ये सर्वत्र म्हटली जाते तशीच ही करूणात्रिपदी मराठीतच म्हणणे आवश्यक आहे असे सद्गुरु श्रीअनिरुद्ध सांगतात. युट्युबमधील व्हिडीओमध्ये ह्या करूणात्रिपदीचे ट्रांस्क्रिप्शन विविध भाषांमध्ये आधीच दिलेले आहे. तसेच माझ्या ब्लॉगवर ह्या करूणात्रिपदीचे ट्रांस्क्रिप्शन(Lyrics) व अर्थही दिलेला आहे.
ह्या करूणात्रिपदी संदर्भात सद्गुरु श्रीअनिरुद्धांनी पितृवचनातून केलेल्या विवेचनातील काही महत्वाच्या भागाची व्हिडिओ क्लिप ह्या पोस्ट सोबत जोडत आहे.
श्रीदत्त करुणात्रिपदी