बापूंची (अनिरुध्दसिंह) तपश्चर्या - २ ( Bapu's Aniruddhasinh's penance 2)
बापूंच्या (अनिरुद्धसिंह) तपश्चर्येचा दुसरा खंड म्हणजे ’उपासना खंड’. ही तपश्चर्या कशासाठी? याचं उत्तर उपासना शब्दातच आहे असं बापू (अनिरुद्धसिंह) म्हणतात. उप-आसन म्हणजे जवळ बसण्यासाठी. बापू (अनिरुद्धसिंह) पुढे सांगतात, " मला कामाला लागायचं आहे; तुमच्या अधिक जवळ यायचं आहे; आणि जेवढी ही दरी कमी होईल तेवढाच मी तुमच्या जवळ येऊ शकेन. तुम्ही माझ्या जवळ येऊ शकता". आता बापू (अनिरुद्धसिंह) आमच्यातलाच एक आहे ह्या प्रेमाच्या भावनेने स्विकारायचं; इच्छा असेल तर. पण मला तुमच्या बरोबर खेळायचं आहे. तुमच्या बरोबर धावायचं आहे आणि वेळ पडलीच तर तुमच्या पुढे उभे राहून जे काही करायचं असेल ते करीन".
तो जवळ येऊ इच्छितो कशासाठी? माझ्यासाठी जे अशक्य आहे; माझी कुवत जिथे संपते; कमी पडते ते शक्य करण्यासाठी.
"तू आणि मी मिळून पाही, अशक्य असे काहीही नाही, देतो मुक्त कंठे ग्वाही, राजाधिराज अनिरुध्द". पुढे जाऊन हे ही सांगतो की "मी तुला कधीच टाकणार नाही". पण आमचं मन मात्र संकल्प विकल्पात्मक असतं; चंचल असतं आणि मग आमचा विश्वास अढळ रहावा यासाठी हा कठीण परिस्थितीतही सुध्दा आधार देण्यासाठी प्रत्येक श्रध्दावान मित्राला विश्वास / ग्वाही देत राहतो की "आमचा बापू हळूहळू आमच्यासाठी सगळं काही नीट करत आहे!". थोडक्यात काय प्रत्येक श्रध्दानाव मित्राला सबुरी ही ठेवावीच लागते.
हे सद्गुरुतत्व कायम "आमच्यासाठी" जवळ येऊ इच्छीतं. पण आम्हीच त्याच्यापासून लांब जात राहतो, पळत राहतो. आम्ही त्याला विसरतो पण तो आम्हाला विसरत नाही. बापू (अनिरुद्धसिंह) म्हणून श्रीमद्पुरुषार्थ ग्रंथाराजात आम्हाला सांगतात,
"सांगाती आहे मी तुमचा खचित
तिनही काळी, तिनही लोकांत
विसरलात तुम्ही मज जरी क्वचित;
मी नाही विसरणार तुम्हास निश्चित"