श्रद्धावान पुरुषार्थ अनिरुद्ध धाम येथे येऊन कुठले उपचार / सेवा करू शकतात?

  1. दररोज सकाळी प्रातःपूजनाच्या वेळेस तसेच संध्याकाळी ४ वाजता देवतांना हार घातले जातात. या पुष्पसेवेसाठी श्रद्धावान ऑनलाईन बुकींग करू शकतात. जे श्रद्धावान पुष्पसेवेचे बुकींग करतात त्यांना पुष्पसेवा झाल्यावर त्याचा प्रसाद घरपोच पाठवला जातो.
  2. श्रद्धावान श्री परांबा परमेश्वरीला ओटी अर्पण करू शकतात.
  3. श्रद्धावान तळघरातील श्री स्वामींच्या स्थानी चवर्‍या ढाळण्याची सेवा करू शकतात.
  4. श्रद्धावान श्री स्वामी समर्थांना बेल, तुळशीपत्र आणि चणे, शेंगदाणे अर्पण करू शकतात.
  5. श्रद्धावान श्री पुरुषार्थ अनिरुद्ध धामच्या आवारात सुदीप लावू शकतात.
  6. श्री पुरुषार्थ अनिरुद्ध धामामध्ये दिवसातून तीन वेळा नित्य पूजन होते त्यामधील माध्याह्न पूजन व सायंपूजनात होणार्‍या आरतीमध्ये श्रद्धावान सहभागी होऊ शकतात.
  7. श्री पुरुषार्थ अनिरुद्ध धाममधील प्रातःपूजनात श्रीपरांबा परमेश्वरीच्या पूजन विग्रहाला तसेच त्रिमितीय श्रीयंत्राला नवगुणी कुंकू अर्पण होते. हे नवगुणी कुंकू श्रद्धावान प्रसादरूपाने घरी घेऊन जाऊ शकतात.