स्तुति-प्रार्थना करण्यामागील भावार्थ (The Motive Behind The Stuti-Prarthana) भगवंताकडे प्रार्थना करताना माणसाने स्वत:च्या नकारात्मक गोष्टी न उगाळता सकारात्मक भावाने प्रार्थना करायला हवी. प्राचीन ऋषिंनी म्हणूनच ‘स्तुति-प्रार्थना’ (Stuti-Prarthana) करण्यास सांगितले आहे. भगवंताकडे सर्व सद्गुण आहेत, सर्व सामर्थ्ये आहेत आणि मी भगवंताचा असल्याने माझ्याकडे थोड्या प्रमाणात तरी नक्कीच आहेत, या विश्वासाने ती अधिक वाढावीत म्हणून भगवंताचे गुणसंकीर्तन केले जाते. स्तुति-प्रार्थना करण्यामागील भावार्थ काय आहे, याबद्दल सद्गुरु श्रीअनिरुद्धांनी त्यांच्या ०१ जानेवारी २०१५ रोजीच्या प्रवचनात सांगितले, जे आपण या व्हिडियोत पाहू शकता.
॥ हरि ॐ ॥ ॥ श्रीराम ॥ ॥ अंबज्ञ ॥