आज आपण सर्वजण श्रीधनलक्ष्मी श्रीयंत्र पूजन उत्सव साजरा करीत आहोत. अतिशय मंगलमयी या अशा उत्सवात सर्वात जास्त महत्वाच असत ते 'श्रीयंत्रपूजन'. प्रत्येक श्रद्धावान भक्त ह्या उत्सवा मध्ये आपापल्या घरातील श्रीयंत्र घेऊन येतो व उत्सव स्थळी येऊन त्या श्रीयंत्राची पूजन व अभिषेक करतो. हे श्रीयंत्र म्हणजे नक्की काय व त्याच्या पूजनाचे अनन्य साधारण महत्व काय हे श्रीमातृवात्सल्यविन्दानाम ग्रंथात आहेच जे इकडे नमूद करत आहे. शिवाय बापूंनी गेल्यावर्षी ह्याच उत्सवाच्या दरम्यान सांगितलेले श्रीयंत्र व त्याच्या पूजनाचे महत्व याची व्हिडीयो क्लिप सुध्दा देत आहे.
आदिमाता चण्डिका(महालक्ष्मी) आणि भक्तमाता आल्हादिनी (श्रीलक्ष्मी) या दोघींचे एकत्रित अधिष्ठान’श्रीयंत्र' असून श्रीयंत्राच्या दर्शन-पूजनाने या दोघींची कृपा सहजपणे प्राप्त करता येते. आद्य महर्षि व कालातीत श्रद्धावान असणार्या अगस्त्य ऋषिंची धर्मपत्नी’लोपामुद्रा' हिने श्री सूक्ता च्यानित्य जपानेच श्रीयंत्राची रचना श्रीगुरुदत्तात्रेयांच्या मार्गदर्शनानुसार केली आहे. सर्वप्रकार चे सामर्थ्य आणि ऐश्वर्ये यांचा मूळस्त्रोत आदिमता चण्डिका आहे. आदिमाता चण्डिके चे सर्वसमर्थत्व आणि सर्व ऐश्वर्य संपन्नत्व’श्री’या तिच्या नामानेदर्शविले जाते. आदिमाता चण्डिके ने भक्तमाता श्रीलक्ष्मीस आपल्या भाळावरील कुंकुमतिलकातस्वस्तिक रूपाने धारण केले आहे. श्रीयंत्रापासून मिळणारा लाभ सद्गुरुगम्य मान लागेला आहे. सद्गुरुंच्या मार्गदर्शनाने सिद्ध केल्या गेलेल्या श्रीयंत्राच्या पूजन-दर्शनाने प्रपंच आणि परमार्थ आनंदमय बनवण्यासाठी आवश्यक असणारे सामर्थ्य आणि ऐश्वर्ये श्रद्धावान प्राप्त करतात. श्रीयंत्राची केवळ उपस्थिती सुद्धाशुभ, ऐश्वर्यदायक, सामर्थ्यप्रद आणि अपरंपार फलप्राप्तिदायक मानली जाते. मग श्रद्धेने श्रीयंत्रचे दर्शन-पूजन घेणार्यास काय बरे प्राप्त होणार नाही? श्रद्धावान प्रेमाने श्रीयंत्र घरात ठेवतात आणि त्याच्या नित्यदर्शनाने त्यापासून शुभस्पंदने प्राप्त करतात. चण्डिकाकुलाची भक्ती अधिकाधीक दृढ करून अभ्युदय आणि नि:श्रेयस साधण्यासाठी श्रद्धावान धनत्रयोदशीला धनलक्ष्मी आणि श्रीयंत्रयांचे पूजन-दर्शन करतात. धनलक्ष्मीची कृपा श्रद्धावानास सर्व प्रकारचे धनवऐश्वर्ये प्रदान करून जीवन धन्य करते. श्रीकृपेने म्हणजेच आदिमाता चण्डिका(महालक्ष्मी) आणि भक्तमाता आल्हादिनी (श्रीलक्ष्मी) यांच्या कृपेने जीवनात नित्यदीपावली चा प्रकाश, मांगल्य आणि आनन्द सदैव रहावायासाठी श्रध्दावान या पूजनात सहभागी होतात. श्रीगुरुदत्तात्रेयांनी लोपामुद्रेस श्रीयंत्राचा अधिष्ठान मंत्र सांगून त्याचा जप करण्याची आज्ञा केली. हा मंत्र म्हणजे देवमाता आदिमाता चंडिका व भाक्तमाता श्रीलक्ष्मी यांचा एकरूप मंत्रआहे - ॐ श्री कमले कमलालये प्रसीद प्रसीद श्रीं ह्रींॐमहालक्ष्म्यैनमोनमः। ll हरीॐll