सरस्वती पूजन (दसरा/विजयादशमी)
पूजन साहित्य
१) हळद, कुंकू, अक्षता २) निरांजन ३) नारळ - २ ४) गुळ-खोबर्याचा नैवेद्य ५) फूले, सोने (आपट्याची पाने) ६) सरस्वती - पुस्तके आणि चित्र ७) सुपारी - २ ८) विड्याची पाने - २ ९) मांडणीत सर्वात मागे महापूजनाची (वरदाचण्डिका प्रसन्नोत्सवातील) किंवा ती नसल्यास मोठी आई (महिषासूरमर्दिनी) व सद्गुरुंची एकत्रित तसबीर ठेवावी.
मांडणी
१) एक चौरंग किंवा पाट घ्यावा व त्यावर वस्त्र अंथरावे.
२) त्यावर खाली चित्रात दाखविल्याप्रमाणे मांडणी करावी.
पूजन विधी
१) प्रथम निरांजनास हळद-कुंकू वहावे. २) त्यानंतर ‘वक्रतुंड’ स्तोत्र म्हणावे.
‘वक्रतुंड’ स्तोत्र
प्रणम्य शिरसा देवं गौरीपुत्रं विनायकम् ।। भक्तावासं स्मरेन्नित्यमायु:कामार्थसिद्धये ।।१ ।।
प्रथमं वक्रतुण्डं च एकदन्तं द्वितीयकम् ।। तृतीयं कृष्णपिगाक्षं गजवक्त्रं चतुर्थकम् ।।२ ।।
लम्बोदरं पञ्चमं च षष्ठं विकटमेव च ।। सप्तमं विघ्नराजेन्द्रं धूम्रवर्णं तथाष्टमम् ।।३ ।।
नवमं भालचन्द्रं च दशमं तु विनायकम् । एकादशं तु गणपतिं द्वादशं तु गजाननम् ।।४ ।।
द्वादशैतानि नामानि त्रिसंध्यं य: पठेन्नर: । न च विघ्नभयं तस्य सर्वसिद्धिकरं प्रभो ।।५ ।।
विद्यार्थी लभते विद्यां धनार्थी लभते धनम् । पुत्रार्थी लभते पुत्रान् मोक्षार्थी लभते गतिम् ।।६ ।।
जपेत् गणपतिस्तोत्रं षड्भिर्मासै: फलं लभेत् । संवत्सरेण सिद्धिं च लभते नात्र संशय: ।।७ ।।
अष्टभ्यो ब्राह्मणेभ्यश्च लिखित्वा य: समर्पयेत् । तस्य विद्या भवेत्सर्वा गणेशस्य प्रसादत: ।।८ ।।
इति श्री नारदपुराणे संकटविनाशनं श्रीगणपतिस्तोत्रं संपूर्णम् ।
३) स्तोत्र म्हटल्यानंतर तसबीरीस **हार घालावा. ४) त्यानंतर **विड्यावर, **नारळावर, पुस्तकांवर आणि आयुधांवर हळद-कुंकू व अक्षता वहाव्यात.
५) त्यानंतर खालील श्लोक म्हणावा.
शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्ण शुभाङ्गम्। लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यम् वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथम्।।
६) त्यानंतर ’’या कुन्देन्दुतुषारहारधवला’ हे स्तोत्र / ही प्रार्थना म्हणत **फूले व **सोने (आपट्याची पाने) अर्पण करावे.
या कुन्देन्दुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता । या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना ॥ या ब्रह्माच्युत शंकरप्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता । सा माम् पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा ॥
७) त्यानंतर २४ वेळा ’ॐ कृपासिंधू श्रीसाईनाथाय नमः’ हा जप करावा. ८) जप म्हणून झाल्यावर निरांजन ओवाळावे व गुळ-खोबर्याचा नैवेद्य अर्पण करावा. ९) त्यानंतर ’विजयमंत्र’ म्हणावा. इथे पूजन संपन्न होते.
ll हरि ॐ ll श्रीराम ll अंबज्ञ ll ll नाथसंविध् ll