प्रेमयात्रा.. न्हाऊ तुझिया प्रेमे...(Premyatra-Nahu Tuzhiya Preme)
न्हाऊ तुझिया प्रेमे’
ह्या प्रेमयात्रेस येणारे आपण सर्व श्रध्दावान रविवार दिनांक २६ मे २०१३च्या दिवशी म्हणजेच नारद जयंतीच्या दिवशी पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील स्पोर्टस् अकॅडमीच्या स्टेडियमवर भेटणार आहोत. सर्व श्रध्दावान या कार्यक्रमासाठी ११ वाजता येऊ शकतात. पण ११ वाजता येणे अनिवार्य नाही हे सर्व श्रध्दावानांनी कृपया लक्षात घ्यावे. बरोबर सकाळी ११:३० वाजल्यापासून दुपारी ३:३० वाजेपर्यंत श्रध्दावान आतापर्यंत झालेल्या सर्व रसयात्रा, भावयात्रा व मोजके महत्त्वाचे उत्सव ह्यांमधील अविस्मरणीय व अलौकिक क्षण त्यावेळी घेतलेल्या फोटोज् व व्हीडीओज्च्या माध्यमातून अनुभवू शकतील. जे श्रध्दावान या रसयात्रांचा आनंद अनुभवू शकले नाहीत त्यांच्यासाठी ही "विशेष पर्वणी" असेल व जे श्रध्दावान ह्या रसयात्रा व भावयात्रांमध्ये सहभागी होते त्यांना हे क्षण पुन्हा अनुभवता येतील. त्यांच्या अलौकिक स्मृतिंना त्यांना पुन्हा उजाळा देता येईल.
त्यावेळचे बापूंचे काही निवडक बोल आपल्याला व्हिडीओज्च्या माध्यमातून अनुभवता येतील.
आम्ही त्यावेळेस नव्हतो ही खंत कुठल्याही श्रध्दावानास आता असणार नाही!
बरोबर ३ वाजून ५५ मिनीटांनी (३:५५ वाजता) नेहमीच्या आपल्या पध्दतिनुसार "रामो राजमणि सदा विजयते..." ह्या विजय मंत्राने ’न्हाऊ तुझिया प्रेमे’ या ’प्रेमयात्रेच्या’ सत्संगाची सुरुवात होईल. तरी सर्व श्रध्दावानांनी उशिरात-उशीरा ३:३० वाजेपर्यंत आपापल्या जागेवर येणे अपेक्षित आहे; प्रेमयात्रेचे पहिले सत्र साधारण ६:१५ पर्यंत चालेल त्यानंतर ३० मिनिटांचा मध्यंतर असेल. बरोबर ६:४५ वाजता सुरु होणारे प्रेमयात्रेचे दुसरे सत्र रात्री १०:०० वाजेपर्यंत असेल.