कार्यकर्त्यांसाठी झालेल्या ’प्रेमयात्रा - न्हाऊ तुझिया प्रेमे’च्या स्क्रीनिंगवर प्रशांतसिंह तळपदे( Prashant Talpade on NTP) यांचा अभिप्राय

२६ मे २०१३ - न्हाऊ तुझिया प्रेमे या कार्यक्रमाच्या दिवशी पद्म्श्री डॉ. डी. वाय पाटील स्टेडियममध्ये प्रसादालयात सेवा असल्याने कार्यक्रम पूर्णपणे पाहता आला नाही. मात्र ९ जून रोजी श्रीहरीगुरुग्रामच्या प्रांगणात हा कार्यक्रम चुकलेल्या सर्व कार्यकर्त्यांसाठी हा कार्यक्रम पुन्हा दाखविण्यात आला. बापू ज्याठिकाणी प्रवचन करतात त्या स्टेजवर त्या स्टेजच्याच आकाराएवढ्या भल्या मोठ्या LED Screen वर कार्यक्रम दाखविण्याची व्यवस्था केली गेली. पाऊस मोठ्या प्रमाणावर पडत होता यासाठी प्रांगणात छप्पर बांधण्यात आले. चहा-कॉफी, नाश्‍ता व जेवणाची व्यवस्था देखील करण्यात आली होती. 'बापू करतो अमुची सेवा' या आद्यपिपांच्या उक्तीची राहून राहून आठवण येत होती. पावसामुळे झालेल्या थंड वातावरणात न्हाऊ तुझिया प्रेमे कार्यक्रम समीरदादा यांच्यासोबत पुन्हा एकदा पाहण्याची संधी मिळाली यासाठी मी अंबज्ञ आहे.कार्यक्रम सुरु होण्याआधी सद्गुरु अनिरुद्धांनी 'मी तुमच्या मागे व पुढे आहेच' हे दिलेले वचन गहिवरून टाकणारे होते. कार्यक्रमाची सुरुवात सुचितदादा विरचित 'श्लोकी'ने झाली. 'भयदु:ख अनिरुद्धे सज्जनांचे पळाले, बोल बोल वाचे श्री अनिरुद्ध आले' yes!!! माझे सद्गुरु श्री अनिरुद्ध आले… फक्त माझ्यासाठी….माझ्यावर अखंड प्रेमाचा वर्षाव करण्यासाठी…  आणि कसे तर "तिमिरातुनी पसरुनी यावा हो, आले ते उजळीत, भक्तीरसाने प्रगटीत होऊनी येती अनिरुद्ध". हा अनिरुद्ध आला व माझ्या मनाच्या सिंहासनावर स्थानापन्न झाला आणि सोबत होते नंदाई आणि सुचितदादा.
कार्यक्रमाची सुरुवातच एवढी दमदार व सुंदर झाली व त्यानंतर गायला गेलेला प्रत्येक अभंग म्हणजे असे वाटत होते की या अनिरुद्धाच्या दिशेने टाकलेले पाऊलच आहे. आद्यपिपा, मीनावैनी, श्रीकृष्णशास्त्री इनामदार, सुशीलाताई, साधनाताई, योगीन्द्र्सिंह, पुर्वावीरा इत्यादींनी रचलेले हे अभंग व गीते ऐकताना फक्त त्याचे, त्या अनिरुद्धाचे प्रेम भरभरून वाहत होते. 
 
'नाम घ्यावे म्हणुनी मिटता रे डोळे, नाम थबकले दिसता तुचि' कितीतरी वेळा झाली आहे आपली ही अवस्था. बापू समोर आले की काय बोलायचे ते कळत नाही. फक्त त्यांच्या रुपाकडे पाहावेसे वाटते. आजदेखील असेच घडत होते, प्रत्येक अभंग ऐकताना व त्याचबरोबर त्याचे ते रूप पाहताना... आयटी टीमचे मनापासून अभिनंदन. अंबज्ञ. ज्यांनी खूप सुंदर Wallpapers बनवली व जी अभंगासोबत दाखविण्यात आली. हे परमात्म्याचे रूप पाहून मन पूर्णपणे त्याच्याच रुपात विरघळून जात होते. 
 
याच वेळेस गौरांगसिंहांनी सादर केलेले निवेदन जणू प्रत्येक भक्तमनाचाच ठाव घेत होते. बापूंचा विरह जाणवायला लागला व मन अधिक वेगाने… अनिरुद्ध वेगाने त्याच्या चरणांना मिठीत घेण्यासाठी धावू लागले... येस अनिरुद्ध वेगानेच… कारण माझ्या मनाची ही गती माझी नव्हतीच. अनिरुद्धानेच माझा हात घट्ट पकडला होता व तोच मला चरणांजवळ खेचत होता.
 
हा कार्यक्रम संपूच नये असे वाटत होते व सर्वात शेवटी स्तब्ध केले ते शेवटच्या प्रार्थनेने - सब सौंप दिया है बापू तेरे हाथों मे... या पुढच्या जीवनातील प्रत्येक क्षण बापुराया फक्त तुझ्याच इच्छेने व्यतित होऊ दे रे… 
 
न्हाऊ तुझिया प्रेमे कार्यक्रम यशस्वी करण्यात मोलाचा सहभाग असणाऱ्या गायक - गायिका, वाद्यवृंद, आयटी टीम व सर्व कार्यकर्त्यांना मनापासून अंबज्ञ.  
 
२६ मे रोजी प्रसादालयात सेवेला असल्यामुळे सलग कार्यक्रम पाहता नाही आला.  हा कार्यक्रम झाल्यावर श्रद्धावानांनी त्यावर दिलेल्या प्रतिक्रिया वाचून व पाहून कुठेतरी, काहीतरी 'मिस' झाले आहे असे राहून राहून वाटत होते. मात्र ९ जूनला समीरदादांनी सर्व कार्यकर्त्यांसाठी केलेली ही व्यवस्था म्हणजे एक पर्वणीच होती. ज्या ज्या कार्यकर्त्यांना हा कार्यक्रम सेवेमुळे पाहता आला नव्हता त्या प्रत्येकाच्या चेहऱ्यावर निरतिशय आनंद दिसत होता व ओठांवर फक्त हेच शब्द होते -  'मी अंबज्ञ आहे'. ब्रेकमध्ये केली गेलेली नाश्त्याची सोय व रात्री कार्यक्रम संपण्यास १० वाजणार म्हणून केलेली जेवणाची सोय पाहून हा देव खरंच आपली किती काळजी घेतो हे पाहून प्रत्येकाचे मन अधिकाधिक अंबज्ञ होत होते. कार्यक्रम संपल्यानंतर स्वत: समीरदादा  सर्व कार्यकर्त्यांची विचारपूस करत फिरत होते. कार्यक्रम संपल्यावर खुर्च्या ठेवण्यासाठी व इतर Winding up करण्यासाठी कार्यकर्ते सरसावले असता सीईओंनी सर्वांना अडवले… जणू हे सर्व कार्यकर्ते त्यादिवशी VIP झाले होते पण प्रत्येकाच्या मनात एकच भावना होती - इतुके अनंत प्रेम फक्त त्याचे… 
 
अंबज्ञ,
प्रशांतसिंह तळपदे
प्रशांतसिंह तळपदे यांच्या फेसबुक प्रोफाईलची लिंक: http://www.facebook.com/prashant.talpade?fref=ts