वसुबारस मंत्र ( Vasubaras Mantra ) - ॐ श्री सुरभ्यै नम: - Aniruddha Bapu Marathi Discourse 14 Nov 2013
‘ ॐ श्री सुरभ्यै नम:। ’
प्रत्येक श्रद्धावान गायीला माता मानतो, तिची पूजा करतो. गोमातेच्या पावलांचे चिह्न उंबरठ्यावर, घरासमोर, देवघरात दररोज काढले जाते. गोवत्सद्वादशीच्या दिवशी म्हणजेच वसुबारसच्या दिवशी गोपद्मं अवश्य काढावीत आणि त्या दिवशी ‘ॐ श्री सुरभ्यै नम:।’ हा मंत्र कमीतकमी ५ वेळा म्हणावा. ‘ॐ श्री सुरभ्यै नम:।’ हा कामधेनूचा श्रेष्ठ मंत्र आणि गोपद्मांचे महत्त्व याबद्दल परम पूज्य सद्गुरु श्रीअनिरुद्धांनी त्यांच्या १४ नोव्हेंबर रोजीच्या प्रवचनात सांगितले, जे आपण या व्हिडियोत पाहू शकता.
॥ हरि ॐ ॥ ॥ श्रीराम ॥ ॥ अंबज्ञ ॥