२७ एप्रिल २०१३ चा शनिवार सांगलीकरांसाठी एक पर्वणी होती. सायंकाळच्या सुमारास परमपूज्य सद्गुरु श्री अनिरुद्ध बापूंचे सांगलीत आगमन झाले आणि सुरू झाला एक आनंदसोहळा, एक जल्लोष. प्रत्येक श्रद्धावानाचे मन आनंदाने एखाद्या मोरासारखे थुईथुई नाचत होते आणि हा आनंद उत्तरोत्तर वाढतच जाणार होता.
२८ एप्रिलला बापू श्रद्धावानांशी त्यांच्या प्रवचनातून संवाद साधणार होते आणि २८ एप्रिलचा रविवार उजाडला. खरं तर परमपूज्य बापूंच्या आगमनानंतर प्रत्येकाला इच्छा होती बापूंचे दर्शन घ्यायची, बापूंचे बोलणे ऐकण्याची आणि बापूंचे प्रेम अनुभवण्याची. २८ एप्रिलला सायंकाळी मैदानावर जमलेल्या श्रद्धावानांनी बापूंच्या मुखातून पहिला शब्द ऐकला आणि सद्गुरुकृपेचा घन त्यांच्यासाठी वर्षू लागला. सांगलीकरांची मोराप्रमाणे थुईथुई नाचणारी मनं आता सद्गुरु अनिरुद्धांच्या कृपेच्या आणि प्रेमाच्या वर्षावात अगदी चिंब भिजून गेली होती... न्हाऊन निघाली होती. खरं तर सद्गुरुंच्या कृपेच्या आणि प्रेमाच्या वर्षावात न्हाऊन निघण्याची इच्छा अगदी प्रत्येक श्रद्धावानाला असते. मात्र मला ही संधी कधी मिळणार, असा प्रश्न प्रत्येकाला पडतो. प्रत्येक श्रद्धावानाची ही तळमळ अगदी लवकरच पूर्ण होणार आहे. २६ मे २०१३ रोजी प्रत्येक श्रद्धावानाला नहायचे आहे ते सद्गुरु प्रेमाच्या आणि सद्गुरु गुणांच्या गुणसंकीर्तनात.असं म्हणतात की चातक पक्षी वर्षभर फक्त पहिला पाऊस पडण्याची वाट बघत राहतो. कारण तो फक्त ह्या पहिल्या पावसाचेच पाणी पितो आणि त्यावर आपली गुजराण करतो. ही जरी कवीकल्पना असली तरी ह्यातून एक नक्की कळतं की हा पहिल्या पावसाचा वर्षाव चातकाला चैतन्याचा असा काही साठा देतो की त्यावरच पुढच्या वर्षभर त्याची गुजराण होते.
सद्गुरु गुणसंकीर्तनाचा वर्षावही प्रत्येक श्रद्धावानाला असेच चैतन्य देतो, मात्र फक्त वर्षभरासाठी नाही तर जन्म जन्मांतरासाठी. म्हणूनच त्या अखंड प्रेमरसात न्हाऊन घेण्यासाठी भेटूया २६ मे २०१३ रोजी.