२६ मे २०१३ तसं बघायला गेलं तर मे महिन्यातला एक रविवार, अगदी फारच डिटेलमध्ये सांगायचं झालं तर २०१३च्या मे महिन्यातला शेवटचा रविवार.
म्हणजे मे महिना संपत आलेला असेल आणि जो तो फक्त पावसाच्या येण्याची वाट बघत असेल; दुष्काळ संपण्याची वाट बघेल.
पण ह्या दिवशी श्रध्दावान वाट बघत असतील सद्गुरु श्रीअनिरुध्दांच्या प्रेमवर्षावात आणि भक्तिरसात आकंठ भिजून जाण्याची, त्यांच्या जीवनातील भक्तिचा, प्रेमाचा दुष्काळ त्या दिवशी कायमचा संपेल ह्याची मला खात्री आहे.
पंढरीची वारी आली की पांडुरंगाच्या भेटीला जाणार्या वारकर्यांची पावलं बघा कशी पंढरीच्याच दिशेने निघतात, तशीच २६ मे २०१३च्या दिवशी हजारो श्रध्दावानांची पावलं निघतील नेरुळच्या पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील स्टेडियमकडे; त्यांच्या अनिरुध्दाला बघण्यासाठी.
मनात असेल उत्कंठा आणि उत्सुकता पोहोचली असेल शिगेला आणि ही उत्कंठा आणि उत्सुकता जेवढी बापूंच्या आगमनाची असेल तेवढीच ती ह्या स्टेडियमवर होणार्या महासत्संगाचीही असेल; या प्रेमयात्रेची असेल.
कारण बापूंच्या दृष्टीक्षेपात, बापूंच्या प्रेमात आणि बापूंच्या कृपेत न्हाऊन निघण्यासाठी सारे श्रध्दावान तिथे एकत्र येणार आहेत आणि निमित्त आहे ते ह्या प्रेमयात्रेचं.
सूर, ताल, लय, शब्द, हे माध्यम आहेत ह्या प्रेमवर्षावांच. कारण प्रत्येक भक्तिरचनेत शब्द, सूर, ताल, लय जरी वेगवेगळे असले तरी प्रत्येकामागचा भाव एकच आहे... ‘माझा बापू’; "माझा अनन्यप्रेमस्वरूप बापू"
ह्या अफाट विश्वाला प्रेमाच्या मात्र एका थेंबाने न्हाऊ घालण्याची ताकद फक्त त्यांच्याकडेच आहे.
थेंब एक हा पुरा अवघे नाहण्या...
अवघ्यांना म्हणजे संपूर्ण श्रध्दावान समुदायाला न्हाऊ घालायला आणि प्रत्येक श्रध्दावानाला नखशिखांत प्रेमात भिजवून टाकायला हा एक थेंब समर्थ आहे.
मग प्रत्येक श्रध्दावानाला काय करायचंय? ‘मी आणि माझा बापू’ ह्या प्रेमरसात डुंबूंन जायचं आहे. कारण ह्या थेंबांच्या धारा आणि धारांची वृष्टी कधी होईल ते कळणारच नाही, इतक्या सहजतेने सगळं घडून येईल.
म्हणूनच आता ध्यानी, मनी आणि ओठीही फक्त"ती प्रेमयात्रा"
न्हाऊ तुझिया प्रेमे….
.