मानवाच्या देहरूपी रथाचे सारथ्य जोपर्यंत मन करत असते, तोपर्यंत खरा रथी साक्षी भावाने राहतो. हेच जेव्हा मनाच्या हातातून सारथ्य काढून बुद्धीकडे सारथ्य दिले जाते, मनाला रथाला जुंपले जाते, तेव्हा तो रथी सक्रिय होतो आणि बुद्दीरूपी सारथ्याला सामर्थ्य पुरवतो. असा हा रथी म्हणजेच राम! मनाच्या हाती सारथ्य न देता बुद्दीकडे सारथ्य देणे महत्त्वाचे का आहे, याबद्दल परम पूज्य सद्गुरु श्री अनिरुद्ध बापुंनी त्यांच्या १० मार्च २००५ रोजीच्या प्रवचनात मार्गदर्शन केले, जे आपण या व्हिडियोत पाहू शकता.
॥ हरि ॐ ॥ ॥ श्रीराम ॥ ॥ अंबज्ञ ॥