राम अवतारात वनवासी रामाला वनातील एका मोराने जलस्रोतापर्यंत जाण्याचा मार्ग स्वत:चे एक एक पीस त्या वाटेवर अर्पण करत करत दाखवला. त्या मोराच्या त्या प्रेमाची आठवण म्हणून रामाने पुढील अवतारात म्हणजेच कृष्णावतारात स्वत:च्या मुकुटावर मोरपीस धारण केले. देव भक्ताला प्रेमाने डोक्यावर घेतो याचे हे उदाहरण आहे. कृष्णाने माथ्यावर मोरपीस का धारण केले आहे, याबद्दल परम पूज्य सद्गुरु श्री अनिरुद्ध बापुंनी त्यांच्या १० मार्च २००५ रोजीच्या प्रवचनात सांगितले, जे आपण या व्हिडियोत पाहू शकता.
॥ हरि ॐ ॥ ॥ श्रीराम ॥ ॥ अंबज्ञ ॥