सुन्दरकाण्डातील 'दीनदयाल बिरिदु सँभारी । हरहुँ नाथ मम संकट भारी ।।' ही या जगातील श्रेष्ठ प्रार्थना आहे. साक्षात भक्तमाता सीतेने स्वत:च्या पतिला म्हणजेच रामाला तिचा देव म्हणून केलेली ही प्रार्थना सर्वोत्तम प्रार्थना आहे. या प्रार्थनारूपी चौपाईचा पल्लव लावून रामायणाचा पाठ करण्याची पद्धत पूर्वापार चालत आली आहे. रामदूत सीताशोकविनाशन हनुमन्त हा जगात सर्वांत सुन्दर आहे आणि म्हणूनच या काण्डाला सुन्दरकाण्ड म्हटले आहे. सुन्दरकाण्डाची महती सांगताना परम पूज्य सद्गुरु श्रीअनिरुद्धांनी त्यांच्या गुरूवार दिनांक २८ ऑक्टोबर २००४ रोजीच्या प्रवचनात मौलिक मार्गदर्शन केले, जे आपण या व्हिडियोत पाहू शकता.
॥ हरि ॐ ॥ ॥ श्रीराम ॥ ॥ अंबज्ञ ॥