श्रावण महिन्यातील घोरकष्टोद्धरण स्तोत्र पठण (Ghorkashtoddharan Stotra Pathan)
श्रावण महिना हा "श्रवण भक्तिचा महिना" म्हणून सर्वश्रुत आहे. म्हणूनच ह्या महिन्यामध्ये अधिकाधिक श्रवण भक्ति (devotion) वाढवून नाम, जप, स्तोत्र पठण करणे हे श्रद्धावानांसाठी श्रेयस्कर असते.
परमपूज्य सद्गुरु बापू सुद्धा अनेकवेळा नाम, जप, स्तोत्र पठण तसेच सांघिक उपासनेचे महत्त्व आपल्या प्रवचनातून विषद करतच असतात. ए.ए.डी.एम.(AADM)च्या कार्यकर्ता शिबीरामध्ये परमपूज्य सद्गुरु बापूंनी श्रद्धावान कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना सांगितले होते की "ए.ए.डी.एम.ची पूर्णपणे उभारणीच मुळी बापूंनी "घोरात्कष्टादुद्धरास्मान्नमस्ते ...." ह्या स्तोत्राचं प्रॅक्टिकल म्हणून केलेली आहे".
अशा ह्या घोरकष्टोद्धरण स्तोत्राचे (Ghorkashtoddharan Stotra Pathan) सांघिक पठण दरवर्षी संस्थेतर्फे श्रावण महिन्यात आयोजित करण्यात येते. ह्या वर्षी श्रावण महिन्यातील हे सांघिक पठण शनिवार, दि.१५ ऑगस्ट २०१५ पासून ते रविवार, दि.१३ सप्टेंबर २०१५ पर्यंत होणार आहे. तसेच ह्या वर्षी मुंबई, ठाणे व पुणे अशा एकूण तीन ठिकाणी हे पठण आयोजित करण्यात आले आहे. त्या ठिकाणांचा पत्ता व पठणाची वेळ खालीलप्रमाणे आहे.
१) श्रीकृष्ण हॉल, जाधव मार्ग, ऑफ एस्.एस्. वाघ मार्ग, चित्रा सिनेमा समोर, गुरुद्वारा जवळ, नायगाव, दादर(पूर्व), मुंबई - ४०० ०१४
शनिवार, दि.१५ ऑगस्ट २०१५ पासून ते रविवार, दि.१३ सप्टेंबर २०१५ पर्यंत
गुरुवार व्यतिरिक्त इतर दिवशी - सकाळी ९.३० ते दुपारी १.०० वाजेपर्यंत व संध्याकाळी ५.३० ते रात्रौ ९.०० वाजेपर्यंत
गुरुवारी - सकाळी ९.३० ते दुपारी १.०० वाजेपर्यंत व दुपारी ४.०० ते संध्याकाळी ७.०० वाजेपर्यंत
२) मावळी मंडळ, चरई टेलिफोन एक्स्चेंज समोर, गणेश टॉकिज जवळ, ठाणे (प)
रविवार, दि.१६ ऑगस्ट २०१५ पासून ते रविवार, दि.२३ ऑगस्ट २०१५ पर्यंत
गुरुवार व्यतिरिक्त इतर दिवशी - सकाळी ९.३० ते दुपारी १२.३० वाजेपर्यंत व संध्याकाळी ५.०० ते रात्रौ ८.०० वाजेपर्यंत
गुरुवारी - सकाळी ९.३० ते दुपारी १२.३० वाजेपर्यंत व दुपारी ३.०० ते संध्याकाळी ६.०० वाजेपर्यंत
३) डॉ.हेडगेवार हॉल, मॉर्डर्न हायस्कूल, जंगली महाराज रोड, शिवाजीनगर, पुणे - ४११ ००५
शनिवार, दि.१५ ऑगस्ट २०१५ पासून ते रविवार, दि.१३ सप्टेंबर २०१५ पर्यंत
दररोज संध्याकाळी ६.०० ते रात्रौ ९.०० वाजेपर्यंत
घोरकष्टोद्धरण स्तोत्राचे पठणात सहभागी होणार्या श्रद्धावानांना संस्थेच्या श्रीचण्डिका स्पिरिच्युअल करंसीतर्फे (Shree Chandika Spiritual Currency) तुलसीपत्राचांही लाभ देण्यात येतो ह्याची सर्व श्रद्धावानांनी नोंद घ्यावी. सर्व श्रद्धावान मित्र ह्या घोरकष्टोद्धरण स्तोत्राच्या सांघिक पठणामध्ये सहभागी होऊन श्रावण महिन्यातील ह्या भक्तीमय उपक्रमाच्या संधीचा लाभ घेतील ह्याची खात्री आहे.
॥ हरि ॐ ॥ ॥ श्रीराम ॥ ॥ अंबज्ञ ॥