आद्यब्रह्मणस्पति सूक्ताचे म्हणजेच ऋग्वेदाच्या प्रथम मंडलातील १८व्या सूक्ताचे विवरण

आद्यब्रह्मणस्पति सूक्ताचे म्हणजेच ऋग्वेदाच्या प्रथम मंडलातील १८व्या सूक्ताचे विवरण

Previoust Article 

English हिंदी ગુજરાતી  বাংলা  తెలుగు   தமிழ் ಕನ್ನಡ   മലയാളം 

संदर्भ - सद्गुरु श्री अनिरुद्ध बापूंच्या दैनिक प्रत्यक्षमधील संतश्रेष्ठ श्री तुलसीदासजी विरचित श्रीरामचरितमानसच्या सुन्दरकाण्डावर आधारित ‘तुलसीपत्र' या अग्रलेखमालिकेतील अग्रलेख क्र. ८५४ - (२४-०६-२०१२)  


सद्गुरु श्रीअनिरुद्धांनी त्यांच्या सुन्दरकाण्डावरील दि. २४-०६-२०१२ च्या अग्रलेखामध्ये म्हणजेच तुलसीपत्र ८५४ मध्ये ‘ब्रह्मर्षि श्यावाश्व आत्रेयांनी उद्दालक याला दिलेल्या वचनानुसार ऋग्वेदाच्या प्रथम मंडलातील १८वे सूक्त, जे ‘आद्यब्रह्मणस्पति सूक्त' म्हणून प्रसिद्ध आहे, त्याबद्दल थोडक्यात विवरण केलेले आहे, जे समजण्यास अगदी सोपे आहे.


तुलसीपत्र-८५४

सुनत बिनीत बचन अति कह कृपाल मुसुकाइ ।
जेहि बिधि उतरै कपि कटकु तात सो कहहु उपाइ ॥३३४॥
(अर्थ : समुद्राचे अत्यंत विनयपूर्ण वचन ऐकून कृपाळू श्रीराम हसून म्हणाले, “हे तात ! वानरांची सेना समुद्र पार करून जाईल असा उपाय सांगा.”)
 
९     किरात काल -
उद्दालकाला दिलेल्या वचनानुसार ब्रह्मर्षि श्यावाश्व आत्रेयांनी ऋग्वेदाच्या प्रथम मंडलातील १८वे सूक्त, जे ‘आद्यब्रह्मणस्पति स्तोत्र' म्हणून प्रसिद्ध आहे ते म्हणण्यास व समजावून सांगण्यास सुरुवात केली.

माघी गणेशोत्सवात श्रीगणपति अथर्वशीर्ष पठणस्थानी विराजमान श्रीगणेश मूर्ती

सूक्त १८

(१)    सोमानं स्वरणं कृणुहि ब्रह्मणस्पते कक्षीवन्तं यः औशिजः॥
हे ज्ञानाचा स्वामी असणाऱ्या ब्रह्मणस्पते! तू औशिज कक्षीवानाला तेजस्वी बनवून त्याचा परमोत्कर्ष घडवून आणलास, त्याचप्रमाणे तुझ्यासाठी स्तोत्र म्हणणाऱ्या परंतु क्षुल्लक असणाऱ्या माझ्यासारख्या भक्ताला प्रगतिपथावर ने.

(२)    यः रेवान्‌‍ यः अमीवहा वसुवित्‌‍ पुष्टिवर्धनः सः नः सिषुक्तु यः तुरः॥
हे ब्रह्मणस्पते! तू ‘रेवान्‌‍' अर्थात कुठलेही ऐश्वर्य देऊ शकणारा आहेस, तूच ‘वसुवित्‌‍' अर्थात अत्यंत दानशूर आहेस, तसेच ‘पुष्टिवर्धन' अर्थात बलवृद्धी करणारा आहेस आणि ‘तुरः' अर्थात कुठलेही कार्य शीघ्र गतीने करणारा आहेस आणि म्हणूनच तू आमच्यावर शीघ्र कृपा कर. 

(३)     मा नः शंसः अररुषः धूर्तिः प्रणङ् मर्त्यस्य रक्ष नः ब्रह्मणस्पते॥
हे ब्रह्मणस्पते! दुराचारी व धूर्त शत्रूंचे बोलणे व त्यांची दुष्कर्मे ह्यांची बाधा आम्हाला होऊ देऊ नकोस, आमचे सर्व बाजूंनी रक्षण कर. 

(४)    सः ध वीरः न रिष्यति यं इन्द्रः ब्रह्मणस्पतिः सोमः हिनोति मर्त्यं॥
ज्या मानवावर ब्रह्मणस्पतिसहित इंद्र आणि सोम कृपा करतात, तो भक्त कधीसुद्धा नष्ट होत नाही किंवा दुर्बल होत नाही.

(५)    त्वं तं ब्रह्मणस्पते सोमः इन्द्रः च मर्त्यं दक्षिणा पातु अंहसः॥
हे ब्रह्मणस्पते! तू स्वतः इंद्र, सोम व दक्षिणा (दक्ष प्रजापतिची कन्या) ह्यांना बरोबर घेऊन भक्ताला त्याच्या पापांपासून वाचवून त्याचे रक्षण करावेस, अशी विनम्र प्रार्थना आहे.

(६)    सदसः पतिं अद्भुतं प्रियं इन्द्रस्य काम्यं सनिं मेधां अयासिषं॥
हे ब्रह्मणस्पते! तू सर्व सदनांचा अधिपति आहेस अर्थात जेथे जेथे म्हणून समूह निर्माण होतो, त्यांतील सांघिक भावनेचा तू नियंत्रक आहेस आणि म्हणूनच तू एकाच वेळेस भक्तसंघातील सर्वांच्या कामना पूर्ण करू शकणारा अद्भुत दानशूर आहेस. तू किरातरुद्राला अतिशय प्रिय आहेस. माझी मेधा अर्थात बुद्धी तीक्ष्ण रहावी, अशी प्रार्थना मी तुला करीत आहे.

श्रीअनिरुद्धगुरुक्षेत्रम्‌ येथील श्रीचण्डिकाकुल आणि श्रीमूलार्क गणेश

७    यस्मात्‌‍ ऋते न सिध्यति यः विपश्चितः च न सः धीनां योगं इन्वति॥
ज्याच्या सहाय्याशिवाय व आधाराशिवाय तपस्व्यांची तपश्चर्या, गायत्री उपासकांचे यज्ञ व विद्वानांची ज्ञानसाधना सफल होऊ शकत नाही, तो ब्रह्मणस्पति श्रद्धावानांच्या प्रज्ञेला सतत प्रेरणा देत राहो.
 ह्या ऋचेस ‘ज्ञानसाधनागायत्री' असे म्हणतात व ह्याच्या अनुष्ठानाने तीन गोष्टी साधतात.

अ)   साधकाची बुद्धी तीक्ष्ण व सबल होते  

ब)   त्याची अर्थ समजून घेण्याची शक्ती वाढत राहते.  

क)   तो कितीही ज्ञानवान झाला,

तरीदेखील तो चण्डिकाकुलाशी विनम्र व शरणागतच राहतो.

(८)    आत्‌‍ ऋध्नोति हविष्कृतिं प्रांचं कृणोति अध्वरं होत्रा देवेषु गच्छति॥
हा महान ब्रह्मणस्पति यज्ञ करणाऱ्यांची व शेतकऱ्यांची सतत उन्नती घडवीत असतो. हा ब्रह्मणस्पतिच सर्व प्रकारचे यज्ञ सफल संपूर्ण करतो. हा ब्रह्मणस्पतिच परमात्म्याची प्रशंसा करणाऱ्या आमच्या वाणीला अर्थपूर्ण बनवतो.

(९)    नराशंसं सुधृष्टमं अपश्यं स प्रथस्तमं दिवः न सद्म-मखसं॥
सूर्यापेक्षाही तेजस्वी असणाऱ्या, अत्यंत पराक्रमी असणाऱ्या, कुठलेही कार्य सहजपणे करणाऱ्या, भक्तांना अतिशय प्रिय असणाऱ्या व मानवांकडून सदैव प्रथम पूजिल्या जाणाऱ्या ब्रह्मणस्पतिला मी पाहिले व त्याच्या दर्शनाने तृप्त झालो.'

अग्रलेखाच्या अंती सद्गुरु श्रीअनिरुद्ध बापू लिहितात - 
‘माझ्या लाडक्या श्रद्धावान मित्रांनो, आपण अष्टविनायक पूजनाच्या व दर्शनाच्या वेळेस किरातरुद्रपुत्र ब्रह्मणस्पति व परमशिवपुत्र गणपति ह्यांच्या एकरूपत्वाचा साक्षात्कार घडविणाऱ्या गौरीपुत्र स्वरूपाला पूजत असतो.' 

माघी गणेशोत्सवादरम्यान अष्टविनायकांचे दर्शन घेताना सद्गुरु श्रीअनिरुद्ध बापू