सप्तचक्र उपासना - अधिक सुलभतेने कशी करावी?
गुरुवार, दि. १५ ऑक्टोबर २०१५ रोजी परमपूज्य सद्गुरु बापूंनी "श्रीशब्दध्यानयोग" ही, श्रद्धावानांचा अभ्युदय (सर्वांगीण विकास) घडवून आणणारी सप्तचक्रांची उपासना श्रीहरिगुरुग्राम येथे सुरु केली. त्यानंतर संस्थेतर्फे ह्या उपासनेची माहिती देणारी पुस्तिकाही श्रद्धावानांकरिता उपलब्ध करण्यात आली. पुस्तिकेत दिलेल्या माहितीनुसार, श्रद्धावान पुस्तिकेतील चक्रांच्या प्रतिमेकडे पाहता पाहता त्या संबंधित चक्राचा गायत्री मंत्र आणि स्वस्तिवाक्य म्हणत घरी उपासना करू शकतात.
गुरुवार, दि. २१ जानेवारी २०१६ रोजी आपल्या पितृवचनामध्ये सद्गुरु बापूंनी अकारण कारुण्याची पुन्हा एकदा प्रचिती देत, श्रद्धावानांकरिता ही उपासना अधिक सुलभ केली. श्रीहरिगुरुग्राम येथे ही उपासना करतेवेळी तसेच घरीसुद्धा सप्तचक्रांच्या प्रतिमांकडे पाहत उपासना करत असताना, त्या त्या चक्राचा फक्त बीजमंत्र ॐ सहित उच्चारल्यासही ते फलदायी ठरेल असे बापूंनी नमूद केले. प्रत्येक चक्राच्या प्रतिमेच्या केंद्रस्थानी असणारे जे अक्षर आहे ते अक्षर म्हणजे त्या त्या चक्राचा बीजमंत्र आहे. उदाहरणार्थ मूलाधार चक्राच्या प्रतिमेच्या केंद्रस्थानी "लं" हे अक्षर आहे. घरी उपासना करताना, सर्वप्रथम पुस्तिकेत दिलेल्या मूलाधार चक्राच्या प्रतिमेकडे पाहत, "ॐ लं", "ॐ लं" असे फक्त पाच वेळा म्हणून मग गायत्री मंत्र व स्वस्तिवाक्य उच्चारण केल्यास ते अधिक फलदायी ठरेल असे बापूंनी सांगितले. अशा तर्हेने खाली दिलेल्या तख्त्याप्रमाणे, प्रत्येक चक्राच्या प्रतिमेकडे पाहत, प्रतिमेच्या केंद्रस्थानी असणारा बीजमंत्र "ॐ" सहित पाच वेळा उच्चारून मग त्या चक्राचा गायत्री मंत्र व स्वस्तिवाक्य म्हणावे.
१) मूलाधार चक्र - ५ वेळा "ॐ लं"
२) स्वाधिष्ठान चक्र - ५ वेळा "ॐ वं"
३) मणिपुर चक्र - ५ वेळा "ॐ रं"
४) अनाहत चक्र - ५ वेळा "ॐ यं"
५) विशुद्ध चक्र - ५ वेळा "ॐ हं"
६) आज्ञा चक्र - ५ वेळा "ॐ उं"
७) सहस्रार चक्र - ५ वेळा "ॐ"
त्याचप्रमाणे बापूंनी सांगितले की श्रीहरिगुरुग्राम येथे "श्रीशब्दध्यानयोग" उपासनेच्या वेळी जेव्हा प्रत्येक चक्राचे मंत्रोच्चार (सूक्त) चालू असतात, तेव्हा सुद्धा त्या त्या चक्राचे सूक्त सुरु झाल्यापासून पूर्ण होईपर्यंत श्रद्धावान वरीलप्रमाणे संबंधित चक्राच्या बीजमंत्राचा अखंड जप करू शकतात.
वरील माहितीच्या अनुषंगाने सप्तचक्रांच्या प्रतिमा, सप्तचक्र दैवतांचे गायत्री मंत्र, सप्तचक्रांची स्वस्तिवाक्ये आणि मातृवाक्य मी श्रद्धावानांच्या सोयीकरिता खाली देत आहे.
सप्त चक्र-प्रतिमा, सप्त चक्र दैवतांचे गायत्री मन्त्र, सप्त चक्रांची स्वस्तिवाक्ये आणि मातृवाक्य
1) मूलाधार चक्र -
मूलाधार चक्र प्रतिमा :
मूलाधार चक्र गायत्री मन्त्र :
ॐ भू: भुव: स्व:।
ॐ एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि।
तन्नो दन्ति: प्रचोदयात्॥
मूलाधार चक्र स्वस्तिवाक्य :
मूलाधारगणेशाच्या कृपेमुळे मी संपूर्णपणे सुरक्षित आहे.
मूलाधारगणेश की कृपा से मैं संपूर्ण रूप से सुरक्षित हूँ।
By the grace of the MuladharGanesh, I am completely safe and secure.
मूलाधारगणेशस्य कृपया अहं संपूर्णत: सुरक्षित:।
२) स्वाधिष्ठान चक्र -
स्वाधिष्ठान चक्र प्रतिमा :
स्वाधिष्ठान चक्र गायत्री मन्त्र :
ॐ भू: भुव: स्व:।
ॐ हिरण्यगर्भाय विद्महे। विरंचये च धीमहि।
तन्नो प्रजापति: प्रचोदयात्॥
स्वाधिष्ठान चक्र स्वस्तिवाक्य:
प्रजापति-हिरण्यगर्भाच्या कृपेमुळे मी सक्षम आहे आणि मी सुखात आहे.
प्रजापति-हिरण्यगर्भ की कृपा से मैं सक्षम हूँ और मैं सुखी हूँ।
By the grace of Prajapati-Hiranyagarbha, I am capable and I am happy.
प्रजापति-हिरण्यगर्भस्य कृपया अहं सक्षम: सुखी च।
3) मणिपुर चक्र-
मणिपुर चक्र प्रतिमा :
मणिपुर चक्र गायत्री मन्त्र :
ॐ भू: भुव: स्व:।
ॐ राघवाय विद्महे। रामभद्राय धीमहि।
तन्नो श्रीराम: प्रचोदयात्॥
मणिपुर चक्र स्वस्तिवाक्य:
श्रीरामकृपेने मी यशस्वी आहे.
श्रीराम की कृपा से मैं यशस्वी हूँ।
By the grace of Shreeram I am successful.
श्रीरामकृपया अहं यशस्वी।
4) अनाहत चक्र-
अनाहत चक्र प्रतिमा :
अनाहत चक्र गायत्री मन्त्र :
ॐ भू: भुव: स्व:।
ॐ तत्पुरुषाय विद्महे। महादेवाय धीमहि।
तन्नो रुद्र: प्रचोदयात्॥
अनाहत चक्र स्वस्तिवाक्य:
माझा पिता त्रिविक्रम मला सदैव क्षमा करतो.
मेरे पिता त्रिविक्रम मुझे सदैव क्षमा करते हैं।
The Trivikram, my Father, always forgives me.
मत्पिता त्रिविक्रम: मां सदैव क्षमां करोति।
5) विशुद्ध चक्र-
विशुद्ध चक्र प्रतिमा :
विशुद्ध चक्र गायत्री मन्त्र :
ॐ भू: भुव: स्व:।
ॐ पुरंदराय विद्महे। वृत्रान्तकाय धीमहि।
तन्नो वेदेन्द्र: प्रचोदयात्॥
विशुद्ध चक्र स्वस्तिवाक्य :
युद्ध माझा राम करणार। समर्थ दत्तगुरु मूळ आधार।
मी सैनिक वानर साचार। रावण मरणार निश्चित॥
युद्ध करेंगे मेरे श्रीराम। समर्थ दत्तगुरु मूल आधार।
मैं सैनिक वानर साचार। रावण मरेगा निश्चित ही॥
My Ram will wage war;
Self-sufficient, Dattaguru is the Origin, the Basis;
A soldier, I am a vanar in word and in deed;
Ravan will die, yes he will.
युद्धकर्ता श्रीराम: मम। समर्थ: दत्तगुरु: मूलाधार:।
साचार: वानरसैनिकोऽहम्। रावणवध: निश्चित:॥
6) आज्ञा चक्र-
आज्ञा चक्र प्रतिमा:
आज्ञा चक्र गायत्री मन्त्र:
ॐ भू: भुव: स्व:।
ॐ महाप्राणाय विद्महे। आञ्जनेयाय धीमहि।
तन्नो हनुमान् प्रचोदयात्॥
आज्ञा चक्र स्वस्तिवाक्य:
साक्षात श्रीहनुमन्त माझा मार्गदर्शक आहे आणि माझे बोट धरून चालत आहे.
साक्षात् श्रीहनुमानजी मेरे मार्गदर्शक हैं और वे मेरी उँगली पकड़कर चल रहे हैं।
Shreehanumanta Himself is my guide and He walks holding me by the finger.
साक्षात् श्री हनुमान् मम मार्गदर्शक: तथा स: मम अंगुलं धृत्वा चलति।
7) सहस्रार चक्र -
सहस्रार चक्र प्रतिमा :
सहस्रार चक्र गायत्री मन्त्र:
ॐ भू: भुव: स्व:।
ॐ महालक्ष्म्यै च विद्महे। सर्वशक्त्यै च धीमहि।
तन्नो जगदम्ब प्रचोदयात्॥
सहस्रार चक्र स्वस्तिवाक्य:
मी परिपूर्ण आहे.
मी सुशान्तमन-दुर्गादास आहे.
मैं परिपूर्ण हूँ।
मैं सुशान्तमन-दुर्गादास हूँ।
I am complete and sufficient.
I am a calm, serene and peaceful server of the Mother Durga.
अहं परिपूर्ण:।
अहं सुशान्तमनोदुर्गादास:।
मातृवाक्य :
माझ्या बालका, मी तुझ्यावर निरंतर प्रेम करीत राहते.
मेरे बच्चे, मैं तुम से निरंतर प्रेम करती रहती हूँ।
My dear child, I love You always.
मम बालक, अहं त्वयि निरन्तरं स्निह्यामि।
॥ हरि ॐ॥ श्रीराम॥ अंबज्ञ॥