
सद्गुरू परमपूज्य बापूंनी त्यांच्या प्रवचनात सांगीतल्याप्रमाणे ’श्रीश्वासम्’ ही त्यांच्याकडून कडून आम्हा सर्व श्रध्दावानांना मिळालेली ही सर्वोकृष्ठ भेट आहे. श्रीश्वासम् उत्सवाच्या माध्यमाने श्रध्दावानांना अनेक सुंदर व पवित्र गोष्टी अनुभवण्याची संधी बापू देत आहेत. ह्या अनेक गोष्टींपैकी एक म्हणजे मुख्यस्टेजसमोर असलेल्या ‘झाली’.
उत्सवाच्या मुख्यस्टेजवर असलेली मोठीआई, चंडिकाकूल, श्रीयंत्रकूर्मपीठम्, शाकंभरी-शताक्षी देवी व बालहनुमंतासहीत असलेल्या अंजानामातेचे दर्शन घेण्याच्या आधी व घेतल्यानंतर देखील श्रध्दावानांना सुबक स्तंभांवर पसरलेल्या पवित्र झालींखालून जायची संधी सद्गुरूंच्या कृपेने उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. ह्या झाली मुख्यस्टेज समोरच ठेवण्यात आल्यालेल्या आहेत. बापूंच्याच मार्गदर्शनानुसार अशा प्रकारच्या झाली पहिल्यांदा श्रीअवधूतचिंतन उत्सवादरम्यान वापरण्यात आलेल्या होत्या. दर वर्षी गुरूपौर्णिमेच्या उत्सवादरम्यान श्रीत्रिविक्रम पूजनामध्ये देखील झालींच्या खाली उभ राहूनच प्रार्थना केली जाते.
ह्या झाली पूर्णपणे बापूंच्या मार्गदर्शनानुसार तयार करण्यात आलेल्या आहेत. बापूंनी त्यांच्या प्रवचनादरम्यान विस्तृतपणे समजावलेल्या सर्व पवित्र अल्गोरीदम्स् (Algorithms) व त्यातील सुभचिन्हं ह्या झांलींवर रेखांकीत करण्यात आलेली आहेत. श्रीआदिमाता सप्तचक्रस्वामिनी पूजन झाल्यावर त्यातील पूजनद्रव्य अर्पण करणारे श्रध्दावान असोत की अपर्णद्रव्य अर्पण करणारे श्रध्दावान असोत की निव्वळ दर्शन घेणारे श्रध्दावान असोत सर्वच जणांना मुख्यस्टेजकडे दर्शनासाठी जाताना व ते झाल्यावर देखील ह्या पवित्र झालींखालून जाण्याची सुसंधी उपलब्ध आहे.
॥ हरि ॐ ॥ ॥ श्रीराम ॥ ॥ अंबज्ञ ॥