तुम्ही केलेले सत्कार्य हे भगवंताला लिहिलेले पत्र असते (Your Good Work Is A Letter To The God) एका व्यक्तीला अनेक ठिकाणी पत्रे पाठवायची असतील तरी त्यासाठी त्याला वेगवेगळ्या पोस्टाच्या पेट्यांमध्ये पत्रे टाकावी लागत नाहीत, तो ती सर्व पत्रे एकाच पेटीत टाकतो. माणूस पोस्टाच्या पेटीत जे पत्र टाकतो, ते त्या पेटीला लिहिलेले पत्र नसून संबंधित व्यक्तीला पाठवलेले पत्र असते. त्याप्रमाणे मानव जे भले काम (Good Work) करतो ते त्या मानवाने भगवंताला पाठवलेले पत्र असते आणि ज्या व्यक्तीसाठी करतो ते त्याचे केलेले सत्कर्म पोस्टाच्या पेटीत पत्र टाकण्याप्रमाणे असते, असे परमपूज्य सद्गुरु श्रीअनिरुद्धांनी त्यांच्या २२ जानेवारी २०१५ रोजीच्या प्रवचनात सांगितले, जे आपण या व्हिडियोत पाहू शकता.
॥ हरि ॐ ॥ ॥ श्रीराम ॥ ॥ अंबज्ञ ॥