सत्य आणि वास्तव (The Truth And The Fact)

सद्गुरू श्री अनिरुद्ध बापूंनी त्यांच्या २० जून २०१३ च्या मराठी प्रवचनात 'सत्य आणि वास्तव' याबाबत सांगितले.

मी तुम्हाला मागेच अनेक वेळा सत्य आणि वास्तव ह्यांच्यामधला फरक समजावून सांगितलेला आहे, बरोबर. की उद्या जर तुम्ही शपथ घेतली की उद्यापासून मी सत्य बोलणार आणि तुम्ही घराच्या बाहेर तुमच्या बसलात, तेच उदाहरण देतो प्रत्येक वेळी, मी दुसरं देणार पण नाही कारण एकच उदाहरण डोक्यात फिट बसू दे. समोर एक तरूण मुलगी धावत आली की ‘काका काका, मला वाचवा, माझ्या मागे गुंड लागले आहेत बलात्कार करण्यासाठी’. तुम्ही तिला सांगाल, ‘बाई गं जा, आतल्या खोलीत जाऊन लपून बस.’ पाठी मागून गुंड आले, ‘काय रे म्हातारड्या! बघितलंस का एक पोरगी धावत गेली ती?’ तुम्ही इथे काय सत्य बोलणार, ‘होय ती मुलगी आत लपली आहे, जा बलात्कार कर’, ह्याला सत्य म्हणता येईल का? नाही. तर हे वास्तव आहे,

It is a fact but not the truth (इट इज अ फॅक्ट बट नॉट द ट्रुथ). इथे हे सांगणं हे अपवित्रता निर्माण करणारं आहे, तिच्या पावित्र्याचा भंग करणारं आहे, तिच्या आनंदाचा नाश करणारं आहे, मग ती गोष्ट कधीच सत्य असू शकत नाही, ती वास्तव असू शकते. It can be a fact but can not be a truth (इट कॅन बी अ फॅक्ट बट कॅन नॉट बी अ ट्रुथ), कारण ट्रुथ आणि फॅक्ट मधला फरक मला माहीत पाहिजे.

आपण सत्याची गोष्ट करतो आहोत,सत्य म्हणजे काय, असं वास्तव ज्याच्यातून फक्त पावित्र्य आणि आनंद उत्पन्न होतो, बरोबर. परंतु मनुष्य जेव्हा असत्य आपल्या बुद्धीचा वापर, असत्य म्हणजेच काय? तर अपवित्रता आणि दु:ख निर्माण करण्यासाठी करतो की ज्याच्यामुळे इतरांना अपवित्रता उत्पन्न होते किंवा स्वत:मध्ये किंवा इतरांमध्ये आणि इतरांना दु:ख होतं, तेव्हा ते काय असतं, असत्य असतं आणि ज्याप्रमाणे मनुष्य स्वत:ची बुद्धी असं असत्य वागण्यासाठी करतो, आपल्या बुद्धीचा वापर अशा असत्याच्या निर्मीतीसाठी करतो, त्या प्रमाणामध्ये त्याच्या जाणिवा अशुद्ध व्हायला लागतात, जाणिवा करप्ट व्हायला लागतात आणि त्याच्या जाणिवा काय व्हायला लागतात, क्षीण व्हायला लागतात आणि म्हणूनच त्याला उघडे डोळे असूनही समोरचं संकट दिसू शकत नाही, संकटाचा आवाज ऐकू येत नाही, त्याचबरोबर देवाने घातलेली हाकसुद्धा ऐकू येत नाही सद्गुरु श्रीअनिरुद्धांनी प्रवचनात ‘सत्य आणि वास्तव'बाबत जे सांगितले ते आपण या व्हिडिओत पाहू शकता.

॥ हरि ॐ ॥ ॥ श्रीराम ॥ ॥ अंबज्ञ ॥