Thursday Announcements dated 6 March 2025


गुरुवार उपासना के बारे में सूचना

गुरुवार, दिनांक १३ मार्च २०२५ के दिन श्रीहरिगुरुग्राम, बांद्रा यहाँ पर, गुरुवार की उपासना एवं परमपूज्य बापू का पितृवचन नहीं होगा ।  कृपया, सभी श्रद्धावान इसे ध्यानमें रखें । 

गुरुवार उपासनेसंबंधी सूचना

गुरुवार, दिनांक १३ मार्च २०२५ रोजी श्रीहरिगुरुग्राम, वांद्रे येथे गुरुवारची उपासना व परमपूज्य बापूंचे पितृवचन होणार नाही याची कृपया सर्व श्रद्धावानांनी नोंद घ्यावी.

----------------------------------

एक विशेष सुचना

पुरुष तथा महिलाओं के लिए, बलविद्या प्रशिक्षण के वर्ग जल्द ही शुरु होनेवाले हैं। इस प्रशिक्षण के वर्ग के लिए वयोमर्यादा १८ से ४५ वर्ष हैं।  इच्छुक पुरुषों के लिए इस प्रशिक्षण के फ़ॉर्म तथा एसकी जानकारी, गुरुवार के दिन, श्री हरिगुरुग्राम में,  गेट नंबर ५ के नजदिक, पुरुषों के बलगट काऊंटर पर उपलब्ध होंगी। तथा इच्छुक महिलओं के लिए, यह फ़ॉर्म, गुरुवार के दिन, श्री हरिगुरुग्राम में,  गेट नंबर ५ के नजदिक, अहिल्या संघ के काऊंटर पर उपलब्ध होंगे ।

जिन महिलओं ने, संबधित फ़ॉर्म कोरोना काल के पहले अहिल्या संघ में भर के दिए हुए हैं और अगर इस फ़ॉर्म में किसी भी तरह के बदलाव हैं, तो उन्हें बिनती हैं की वे अहिल्या संघ के काऊंटर पर आकर ,इसकी जानकारी लिखित स्वरुप में अहिल्या संघ को दें। 

एक विशेष सूचना

पुरुष तसेच महिलांसाठी, बलविद्या प्रशिक्षणाचे वर्ग लवकरच सुरू होणार आहेत. या प्रशिक्षण वर्गासाठी वयोमर्यादा १८ ते ४५ वर्षे आहे. इच्छुक पुरुषांसाठी या प्रशिक्षणाचे फॉर्म तसेच त्याची माहिती, गुरुवारी, श्री हरिगुरुग्राम येथे, गेट क्रमांक ५ च्या जवळ, पुरुषांच्या बलगट काउंटरवर उपलब्ध असेल. तसेच इच्छुक महिलांसाठी, हे फॉर्म, गुरुवारी, श्री हरिगुरुग्राम येथे, गेट क्रमांक ५ च्या जवळ, अहिल्या संघाच्या काउंटरवर उपलब्ध असतील. 

ज्या महिलांनी, संबंधित फॉर्म कोरोना काळाच्या आधी अहिल्या संघात भरून दिले आहेत आणि या फॉर्ममध्ये काहीही बदल करायचे असतील, तर त्यांना विनंती आहे की त्या अहिल्या संघाच्या काउंटरवर येऊन,
ही माहिती लेखी स्वरूपात अहिल्या संघाकडे द्यावी.  

----------------------------------


नवरात्री में त्रिविक्रम मठ और तीर्थक्षेत्रो में रात्रपठन के बारे में सुचना 

सदगुरु श्री अनिरुद्ध बापू ने, उनके पितृवचनो में, शुभंकरा और अशुभनाशिनी नवरात्र उत्सव में, रात्रपठन का महत्व कई बार समझाया हैं। 

श्री अनिरुद्ध गुरुक्षेत्रम्‌ में श्रद्धावान, रामरसायन ग्रंथपठन के बाद, अन्य आध्यात्मिक वाचन हररोज करते हैं। नवरात्री ऊत्सव में, रात्रपठन का विशेष महत्व होने के कारण, इन दिनोमें, बहुत सारे श्र्द्धावान गुरुक्षेत्रम्‌ में रात्रपठन करना चाहते हैं| लेकिन, जगह की मर्यादा के कारण, ’प्रथम आनेवाले को प्रथम प्राधान्य’ इस तत्व पर, श्रद्धावानों को रात्रपठन का अवसर उपलब्ध होता है। 

जैसे श्री अनिरुद्ध गुरुक्षेत्रम्‌ में रात्रपठन होता है, इसी तरह, अब, श्रद्धावानों को, शुभंकरा और अशुभनाशिनी नवरात्री उत्सव में, रात १०.०० बजे से सुबह ६.०० बजे तक, रात्रपठन में शामिल होने का अवसर, आगे दिए हुए क्षेत्रो में प्राप्त होनेवाला है। 

इस वर्ष, नवरात्री उत्सव, रविवार दिनांक ३० मार्च २०२५ से शनिवार, दिनांक १२ अप्रैल २०२५ तक मनाया जएगा। 

नवरात्री उत्सव में, रात्रपठन के लिए उपलब्ध क्षेत्रोंके नाम इस प्रकार है- 

1. त्रिविक्रम मठ वडोदरा, रत्नागिरी, मुंबई पश्चिम उपनगर (बोरीवली) तथा मिरज(सांगली)
2. गोविद्द्यापीठ्म, कर्जत
३. गुरुकुल जुईनगर, नवी मुंबई. 

अधिक जानकारी के लिए सी.सी.सी.सी. से संपर्क करें।


नवरात्री कालावधीत त्रिविक्रम मठ आणि तीर्थक्षेत्रांमध्ये रात्रपठणाबाबत सूचना 

सद्गुरु श्री अनिरुद्ध बापूंनी, त्यांच्या पितृवचनांमध्ये, शुभंकरा आणि अशुभनाशिनी नवरात्र उत्सवात, रात्रपठणाचे महत्त्व अनेक वेळा समजावून सांगितले आहे.

श्री अनिरुद्ध गुरुक्षेत्रम्‌मध्ये श्रद्धावान, रामरसायन ग्रंथपठणानंतर, अन्य आध्यात्मिक वाचन दररोज करतात. नवरात्र उत्सवात, रात्रपठणाचे विशेष महत्त्व असल्याने, या दिवसांत, अनेक श्रद्धावान गुरुक्षेत्रम्‌मध्ये रात्रपठण करू इच्छितात. परंतु, जागेच्या मर्यादेमुळे, प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्त्वानुसार, श्रद्धावानांना रात्रपठणाची संधी उपलब्ध होते.

जसे श्री अनिरुद्ध गुरुक्षेत्रम्‌मध्ये रात्रपठण होते, त्याचप्रमाणे, आता, श्रद्धावानांना, शुभंकरा आणि अशुभनाशिनी नवरात्र उत्सवात, रात्री दहा वाजल्यापासून ते सकाळी सहा वाजेपर्यंत, रात्रपठणात सहभागी होण्याची संधी, पुढील क्षेत्रांमध्ये मिळणार आहे.

या वर्षी नवरात्र उत्सव रविवार, दिनांक ३० मार्च २०२५ ते शनिवार, दिनांक १२ एप्रिल २०२५ दरम्यान साजरा केला जाणार आहे.

नवरात्र उत्सवात रात्रपठणासाठी उपलब्ध क्षेत्रे पुढीलप्रमाणे आहेत:

१. त्रिविक्रम मठ वडोदरा, रत्नागिरी, मुंबई पश्चिम उपनगर (बोरीवली) तसेच मिरज (सांगली),

2. गोविद्द्यापीठम्‌, कर्जत

3. गुरुकुल जुईनगर, नवी मुंबई.

अधिक माहितीसाठी सी सी सी सी कडे संपर्क साधावा.