निर्णय घेण्यापूर्वी सर्व पैलूंचा विचार करा (Think About Every Aspect Before You Decide) लहानशा गोष्टींबाबतही सावधपणे विचारपूर्वक निर्णय घेणे आवश्यक आहे. लहानशा गोष्टीमध्येसुद्धा कुणाचा केलेला अपमान संबंधित व्यक्तीच्या जिव्हारी लागून त्याचा गंभीर परिणाम होऊ शकतो. सर्वांनी एकत्र मिळून मिसळून राह्णे चांगलेच आहे, पण म्हणून कुणी त्याचा बांडगुळाप्रमाणे गैरफायदा घेऊ नये. माणसाने साध्याशा वाटणार्या गोष्टींकडे दुर्लक्ष न करता सर्व पैलूंचा विचार (Think) करून तेथेही विवेकाने निर्णय घ्यावा, परमपूज्य सद्गुरु श्रीअनिरुद्धांनी त्यांच्या २२ जानेवारी २०१५ रोजीच्या प्रवचनात सांगितले, जे आपण या व्हिडियोत पाहू शकता.
॥ हरि ॐ ॥ ॥ श्रीराम ॥ ॥ अंबज्ञ ॥