The Third World War - ’ तिसरे महायुध्द ’

मार्च २००६ साली बापूंनी (डॉ. अनिरुद्ध धैर्यधर जोशी) लिहिलेल्या ’ तिसरे महायुध्द ’ ह्या पुस्तकाप्रमाणे गेल्या ३-४ वर्षापासून जागतिक पटलावरती कमालीच्या घडामोडी घडताना आपण बघत आहोत. आधी दिवसागणिक बदलणारी परिस्थिती आता तासागणिक बदलू लागली आहे. आता २०१८ मध्ये जगातील अनेक भागांमध्ये सुरू असणारे तंटे दैनंदिन संघर्षाचे रूप घेत आहेत आणि हेच वास्तव आहे. भयानक मानवी क्रौर्याचे पाशवी व निर्दयी तांडव जवळपास ६० राष्ट्रांमध्ये सुरू आहे व तिसर्‍या महायुद्धाचा भडका कुठल्याही क्षणी उडु शकतो. इतके असूनसुद्धा सामान्य मानव ह्या वास्तवाशी, दाहकतेशी व परिणामांशी बराचसा अनभिज्ञ आहे.

या सगळ्याचा विचार करता डॉ. अनिरुद्ध धैर्यधर जोशी म्हणजेच आपले बापू यांच्या मार्गदर्शनाखाली ’दैनिक प्रत्यक्ष’ दिनांक ६ मार्च २०१८ पासून तिसर्‍या महायुद्धाच्या संबंधीत विशेष बातम्या प्रकाशित करीत आहे. सामान्य मानवाची अनभिज्ञता दूर करण्यासाठी आपण एक वेबसाईटही लॉन्च केली आहे - www.worldwarthird.com

The Third World War – ’तिसरे महायुध्द’

शिवाय ही वेबसाईट म्हणजे ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, गुगल प्लस, पिंटरेस्ट इत्यादी विविध सोशल मिडीया प्लॅटफॉर्मचे प्रवेशद्वार खुले करुन देईल, जिथे आपण ह्यासंबधी विषयांवर आपले विचार व मत मांडु शकतो आणि माहिती घेऊ / देऊ शकतो. आपले विचार व मत - ट्विट्स्‌, फेसबुक कॉमेंट्स्‌, स्वत:च्या ब्लॉग द्वारे किंवा इतरांनी लिहिलेल्या कॉमेंट्स्‌ना रिप्लाय देऊन करु शकतो. आपण आपले विचार / मत आपापल्या मित्रांमध्ये व इतर ग्रुप्स्‌मध्ये देखील शेअर करु शकतो.

प्रत्येकाचे विचार व मत हे महत्त्वाचेच आहेत कारण प्रत्येक जण ह्या समाजाचा म्हणजेच प्रत्यक्ष युद्धाचे परिणाम भोगणार्‍या समुहाचा अविभाज्य भाग असतो. बहुतांश समाजाला युद्ध नको असते, परंतु युद्ध हे अपरिहार्य वास्तव असते. हे आपण मध्यपूर्वेत घडताना बघतो आणि इराक व अफगाणिस्तान मध्ये घडलेले बघीतले.

या वेबसाईटद्‍वारे तिसर्‍या महायुद्धाशी संबंधीत विचार, मतं व माहिती खालील ठिकाणी मांडू शकतो. 1. ट्विटर वर - https://twitter.com/ww3info 2. ट्विटरवरील तिसर्‍या महायुद्धाशी संबंधीत व्हिडीओज्‌वर - https://twitter.com/ww3videos 3. फेसबुकवरील (https://www.facebook.com/WW3Info/) व गुगल प्लस (https://plus.google.com/106534928845401500853) तिसर्‍या महायुद्धाशी संबंधीत पोस्टवर 4. इन्स्टाग्राम (https://www.instagram.com/thirdworldwar_news/) वरील तिसर्‍या महायुद्धाशी संबंधीत फोटोंवर

समीरसिंह दत्तोपाध्ये दिनांक - ५ मे २०१८

Hindi