श्रद्धावानांच्या जीवनातील हनुमान चलिसाचे महत्त्व (The Significance of Hanuman Chalisa in Shraddhavan's Life)

सद्गुरू श्री श्रीअनिरुद्धांनी त्यांच्या २० जून २०१३ च्या मराठी प्रवचनात ‘श्रद्धावानांच्या जीवनातील हनुमानचलिसाचे महत्त्व’ (The Significance of Hanuman Chalisa in Shraddhavan's Life)’ याबाबत सांगितले.

तर असा हा हठयोग तुमच्या जाणिवा शुद्ध करणारा तुम्हाला सहजपणे दिलेला आहे तो तुलसीदासजींनी, आलं लक्षामध्ये. हनुमानचलीसा हे असं स्तोत्र आहे कि कुठलीही आसनं, वेडेवाकडे चाळे, आचरटपणा न करता जेव्हा तुम्ही हनुमंताचं स्मरण करीत हनुमानचलिसाचं पठण करता, त्यातली जी एक एक ओळ आहे, ती ओळ आठवायला बघता, तेव्हा-तेव्हा ती-ती कृती तुमच्या आयुष्यामध्ये घडते, आलं लक्षामध्ये.

म्हणजे ‘दुर्गम काज जगत के जेते। सुगम अनुग्रह तुम्हरे ते ते। दुर्गम काज जगत के जेते। सुगम अनुग्रह तुम्हरे ते ते॥’ म्हणजे काय? हे जग जिंकणार्‍या, जे काम दुर्गम आहे सगळ्यांसाठी, सगळ्या जगाला मिळून जे दुर्गम आहे, सुगम अनुग्रह तुम्हरे तेते. तुमच्या अनुग्रहाच्या एका केवळ लवलेशामुळे सुद्धा हे दुर्गम काज सहजपणे होऊन जातात. मग हे करताना आपलं जे काम अडलेलं आहे त्याचा विचार करू नका. आम्ही नेमकं काय चूक करतो? ही ओळ म्हणताना म्हणायची, पण कशी म्हणायची? की मला नोकरी मिळायला पाहिजे, काम होऊ देत, ते होणारच नाही कारण तुम्ही कशावर ध्यान करताय? तुम्ही concentration कशावर करताय? हनुमंतावर नाही, हनुमंताच्या शक्तीवर नाही, स्वत:च्या कामावर, ते काम तुम्हाला पावणार नाही आहे. त्याच्याऐवजी तुम्हाला काय दिसलं पाहिजे? तर समुद्रलंघन करून जाणारा तो हनुमंत. ‘प्रभु मुद्रिका मेलि मुख माहीं। जलधि लाँघि गए अचरज नाहीं॥’ पुढे काय? हा, ह्या दोन ओळी जोडलेल्या आहेत लक्षात ठेवा, ओ.के. त्यावेळी तुम्हाला काय दिसलं पाहिजे? तो समुद्रावरून उड्डाण करणारा, कोणासाठी, स्वत:साठी नाही. राम-सीता जानकी साठी उड्डाण करणारा हनुमंत दिसला पाहिजे.

पण होतं काय? तिकडे सुद्धा स्मरण राहत नाही. ‘संकट ते हनुमान छुडावै। मन क्रम बचन ध्यान जो लावै॥’ मन क्रम बचन ध्यान जो लावै, वचन म्हणजे तुलसीदासांच वचन. तुलसीदासांच्या ह्या हनुमानचलीसावर म्हटलय ते, मन क्रम बचन ध्यान जो लावै, कि ह्याच्यात जो क्रम दिलेला आहे. ह्याची गोष्ट तुलसीदासांनी सुद्धा वचन आहेत, तुलसीदासांचे शब्द आहेत. त्याच्यावर जो मन लावतो क्रमवारपणे, पहिल्यापासून शेवटपर्यंत त्याच्या जीवनातले सगळे क्रम सुरळीत होऊन जातात, समजलं. पण आम्हाला एकदा हनुमानचलीसा म्हणताना प्रत्येक ओवीला ती गोष्ट डोळे बंद करून आठवण जमणार नाही आणि त्यासाठीच आमची तुलसीदासजींनी सोय करून दिलेली आहे की वटपौर्णिमा ते गुरुपौर्णिमा हा एक महिना, महिन्यामध्ये एकदा जरी तुम्ही दिवसातून १०८ वेळा हनुमानचलिसाच पठण केलतं, तर हनुमानजींचंच वचन आहे, तुमचे सगळेच्या सगळे क्रम जे बिघडले आहेत ते दुरूस्त करीन, पटतंय.

ती गोष्ट आठवते तुम्हाला त्यावेळेस मी सांगितलेली, तिथे तुलसीदासजींनी काय मागितलं हनुमंताकडे? की लोकांचं पाप-पुण्य ह्यांचा हिशोब न करता देवा! तू एवढ कार्य जरूर कर कारण तुलसीदासजींनी स्वत:साठी नाही तर इतरांसाठी मोठी तपश्चर्या केली होती. दिवसातून तीन वेळा ते १०८ वेळा हनुमानचलीसाचं रटन करत असतं तेव्हा घडलेली ही गोष्ट आहे बरोबर. तेव्हा हनुमानजी प्रसन्न झाले प्रगट झाले, त्यांनी दर्शन दिलं, वाईट लोकांचा समाचार घेतला, वाईट वस्तू निर्दालून काढली आणि वरती त्यांनी तुलसीदासजींला एक वचन दिल, काय? की मी सगळ्यांना सहाय्य करीन. त्यांनी सांगितलं, ‘मला केलतं तसं करा, पण प्रत्येकजण माझ्या एवढी उपासना करू शकेल अशी अट घालू नका.’ त्यासाठी परत त्यांनी उपासना करायला सुरू केली, तेव्हा हनुमानजींनी त्यांना हे वचन दिलं, बरोबर.

कारण आपल्या शरीरामध्ये १०८ शक्तिकेंद्रे आहेत ती कशाची आहेत? ह्या जाणीवेची शक्तिकेंद्र आहेत. मी तुम्हाला नेहमी सांगतो की आपल्या शरीरामध्ये १०८ शक्तिकेंद्रं आहेत, कशी? ३६-३६-३६. कुठल्या? त्रिविध देहांमध्ये, प्राणमय देह, मनोमय देह आणि भौतिक देह. तर ह्या १०८ च्या १०८ केंद्रं बेसिकली कोणाच्या सत्तेखाली आहेत? जाणीवेच्या सत्तेखाली आहेत. तुम्ही unconscious झालात म्हणजे तुमची जाणीव गेली, भान हरपलं की सगळी सत्ताकेंद्रं काही काम करू शकत नाहीत आणि ही १०८ च्या १०८ सत्ताकेंद्रं, त्यांच्यामधला बिघडलेला क्रम दुरुस्त कोण करतो? हनुमान करतो, हनुमंत करतो, हनुमानजी करतो.

सद्गुरु श्रीअनिरुद्धांनी प्रवचनात ‘श्रद्धावानांच्या जीवनातील हनुमान चलिसाचे महत्त्व’ याबाबत जे सांगितले, ते आपण या व्हिडिओत पाहू शकता.

ll हरि: ॐ ll ll श्रीराम ll ll अंबज्ञ ll