श्रीसूक्ताच्या पहिल्या ऋचेचा अर्थ- भाग १६ (The Meaning Of The First Rucha Of Shree Suktam - Part 16) - Aniruddha Bapu Marathi Discourse 25 June 2015
श्रीसूक्ताच्या पहिल्या ऋचेचा अर्थ- भाग १६ (The Meaning Of The First Rucha Of Shree Suktam - Part 16) ‘जातवेद’ या शब्दाचा एक अर्थ ‘वेदांना जाणणारा’ असा आहे. ‘सर्वकाही जाणणारा’ हादेखील जातवेद या शब्दाचा अर्थ आहे. मानवाला माहीत नसणार्या अनेक गोष्टी असतात, पण त्या श्रीमातेचा पुत्र असणार्या जातवेदाला सर्वकाही ठाऊकच असते. ‘स्वस्तिक्षेमसंवादात’ चण्डिकाकुलाशी संवाद साधताना ‘या जातवेदाला सर्वकाही माहीतच आहे’ याचे भान राखणे महत्त्वाचे आहे. श्रीसूक्ताच्या पहिल्या ऋचेतील ‘जातवेद’ या नामासंदर्भात सद्गुरु श्रीअनिरुद्धांनी त्यांच्या २५ जून २०१५ रोजीच्या प्रवचनात जे सांगितले, ते आपण या व्हिडियोत पाहू शकता.
॥ हरि ॐ ॥ ॥ श्रीराम ॥ ॥ अंबज्ञ ॥