श्रद्धावानांच्या जीवनातील हनुमानचलिसाचे महत्त्व - भाग २

सद्गुरू श्री श्रीअनिरुद्धांनी त्यांच्या २० जून २०१३ च्या मराठी प्रवचनात ‘श्रद्धावानांच्या जीवनातील हनुमानचलिसाचे महत्त्व - भाग २’ (The Significance of Hanuman Chalisa in Shraddhavan's Life - Part 2)’ याबाबत सांगितले. 

असा हा महिना दोन पौर्णिमांच्या मध्ये बसलेला. ह्या महिन्यामध्ये कोणाचं स्मरण करायचं आहे? हनुमानचालिसाचं स्मरण करायचं आहे. म्हणजे हनुमानचालिसातल्या हनुमंताच्या चरित्राचं स्मरण करायचं आहे. तुमच्या लक्षात आलं, आम्ही अनेक जण करतो.

पण खरच सांगतो तुम्हाला राजानों, एकशे आठ (हनुमानचालिसा) मध्ये करताना ज्या-ज्या ओवीला तुम्हाला ते चित्र आठवेल ना ती ओळ तुम्हाला खूप काही देऊन जाईल बाळानों. ‘दुर्गम काज जगत के जेते।’ म्हणताना तो मोठं समुद्र उल्लंघन करणारा, उड्डाण करणारा हनुमंत दिसला पाहिजे, आलं लक्षामध्ये पटतय. त्यानंतर दुसरं कुठलं चित्र येत? ‘संकर सुवन केसरीनंदन। तेज प्रताप महा जग बंदन॥’ बरोबर. इकडे आपल्याला तो केसरीचा पुत्र दिसला पाहिजे, शिवाचा सुवर्ण दिसला पाहिजे बरोबर. ‘काँधे मूँज जनेऊ साजै।’ म्हणजे काय? खांद्यावरून त्याच्या यज्ञोपवित्र म्हणजे जानवं रूळतय, ते जानवं दिसलं पाहिजे, आलं लक्षामध्ये आणि हे आपल्याला काय करायच? इमॅजीन करायच आहे, कल्पना करायची आहे. मी तुम्हाला दृष्टांत व्हावा वैगरे असं काही म्हणत नाही राजानों, साधंसुध डोळे बंद करायचे. आपण कुठली कल्पना करतो ना, बघा कस आहे आपण कल्पना करतो, आहाऽ आता काय चिकन, तंगडी, कबाब आणून समोर ठेवलेलं आहे ते दिसताहेत, ते कशी आठवतात आपल्याला पटकन दिसतात की नाही? बरोबर तसं आपल्याला ती चित्र पण दिसली पाहिजे आणि दिसू शकतात.

बघा आपली आई परगावी असते, वडिल कुठे दुसरीकडे गेलेले असतात त्याने डोळे बंद केले की चेहरा आठवतो की नाही आपल्याला मला सांगा, हो की नाही? एवढच नाही तर ज्या व्यक्ती हे जग सोडून गेली आहेत त्यांचा चेहरा सुद्धा आठवतोय की नाही आपल्याला सांगा? बरोबर. मग ही हनुमंताची कथा जी आपण वाचतो, जी आपण ऐकलेली असते ती आपल्याला आठवायला काय कठीण आहे? एकशे आठ वेळा म्हणायचं, म्हणायलाच पाहिजे खरच सांगतो प्रत्येकाने. ही काय माझी ऑर्डर नाही आहे पण एकदा तरी त्या एकशे आठ मध्ये करताना, एकदा तरी म्हणजे प्रत्येक वेळी एक एकदा म्हणताना त्यातली एक-एक ओळ जरी तुमच्या समोर चित्र म्हणून प्रगटली तरी देखील सूर्य आणि चंद्र म्हणजे अग्नितत्त्व आणि शोमतत्त्व, प्राणतत्त्व आणि क्रमबद्धता म्हणजेच तुमच्या जाणीवा. तुम्हाला दोन विरुद्ध दिशांना ओढणार्‍या जाणीवांचं स्वरूप म्हणजेच सूर्य आणि चंद्र.

सद्गुरु श्रीअनिरुद्धांनी प्रवचनात ‘श्रद्धावानांच्या जीवनातील हनुमान चलिसाचे महत्त्व’ याबाबत जे सांगितले, ते आपण या व्हिडिओत पाहू शकता.

ll हरि: ॐ ll ll श्रीराम ll ll अंबज्ञ ll