गुरुपौर्णिमेचे महत्त्व (The Significance of Gurupaurnima)

सद्गुरू श्री श्रीअनिरुद्धांनी त्यांच्या २० जून २०१३ च्या मराठी प्रवचनात ‘गुरुपौर्णिमेचे महत्त्व’ याबाबत सांगितले.

तर हा हनुमानचलीसा पाठ, जो वटपौर्णिमा पासून सुरु होतो आणि गुरुपौर्णिमेपर्यंत चालतो. ह्या़चा अर्थ आम्ही लक्षात घेतला पाहिजे की पहिल्याच दिवशी ‘दुर्गम काज जगत के जेते। सुगम अनुग्रह तुम्हरे ते ते॥’ हा यम, हा सुद्धा कोण आहे? सूर्यपुत्रच आहे, बरोबर. यम हा सूर्यपुत्र आहे आणि हनुमंत हा सूर्याचा, कोण आहे? शिष्य आहे आणि त्याच्याआधी, हनुमंत काय करतो? सूर्याला गिळणारा आहे म्हणजे त्याच्या बापाला ही गिळतो.

आम्ही म्हणतो ना तुमच्या बापालाही भारी आहे, बरोबर की नाही, तर त्याच्या बापाला ही भारी असणारा हा हनुमंत आहे, आलं लक्षामध्ये आणि म्हणून आपण लक्षात घेतलं पाहिजे की वटपौर्णिमा म्हणजे असा दिवस, ज्या दिवशी सगळं चैतन्य निघून गेलं अशा स्थितीमधल्या पतीला एका स्त्रीने, जी काही तपस्विनी नव्हती, केवळ आपल्या पातिव्रत्याच्या जोरावर, प्रेमाच्या जोरावर, पावित्रेच्या जोरावर परत आणलं, त्यादिवशीच आमची उपासना सुरू होते, आलं लक्षामध्ये.

वटवृक्ष कसा आहे बघा, एक वृक्ष असा मधून निघतो बरोबर, तो वाढतोच, त्यातून इथून एक फांदी निघते, ती खाली येते, तिच्या बरोबर दुसरा वृक्ष होतो़च ह्याबाजूला आणखीन एक असे किती वृक्ष तयार होतात एका वृक्षामधून, क्रमाने. तो क्रम कोण ठरवतो? त्या वटवृक्षाची ती मुळं, बरोबर त्या पारंब्या, नाही, त्याच्या मागे असणारा तो महाप्राण. पण हा एकमेव वटवृक्ष असा आहे की जो पाहिजे तेवढा विकास करू शकतो.

असं दुसरं कुठलं झाड आहे का? वनस्पती आहे का? नाही. असा विकास मनुष्याचा व्हावा अशी माणसाची इच्छा असते. म्हणून खूप मोठा आधार गेला की आपण काय म्हणतो? अरे त्या संस्थेचा किंवा त्या घराचा आधारवड गेला, लक्षात आलं. अशी ही वटपौर्णिमा आणि तिथपासून पुढे एक महिना म्हणजे आषाढपौर्णिमा म्हणजे गुरुपौर्णिमा, व्यास पौर्णिमा की ज्या दिवशी सद्‍गुरुतत्त्व खुलेपणाने बसलेलं असतं, प्रत्येकाला त्याच्या क्षमतेच्या अनेक पटीने देण्यासाठी.

सद्गुरु श्रीअनिरुद्धांनी प्रवचनात श्रीअनिरुद्धांनी प्रवचनात ‘गुरुपौर्णिमेचे महत्त्व’ याबाबत जे सांगितले, ते आपण या व्हिडिओत पाहू शकता.

 ॥ हरि ॐ ॥ ॥ श्रीराम ॥ ॥ अंबज्ञ ॥