गुरुक्षेत्रम् मन्त्राचे श्रद्धावानाच्या जीवनातील महत्त्व - भाग ५

सद्गुरू श्री श्रीअनिरुद्धांनी त्यांच्या ०८ एप्रिल २०१० च्या मराठी प्रवचनात ‘गुरुक्षेत्रम् मन्त्राचे श्रद्धावानाच्या जीवनातील महत्त्व’ याबाबत सांगितले.

ज्या भविष्याला सगळी जणं घाबरतात, कधी काय येऊन आदळेल आम्हाला माहित नसतं, त्या भविष्याच्या पुढे सुद्धा हातात टॉर्च, काठी आणि बंदूक, म्हणजे काय? सर्वबाधाप्रशमनं, सर्वपापप्रशमनं, सर्वकोपप्रशमनं म्हणजे तुमचे ज्या काही बाधा झालेल्या आहेत, की केलेल्या कृत्यामुळे घडलेल्या सजा असोत, त्या प्रारब्धाच्यामुळे येणारी, आदळणारी संकटे असोत, त्यांचं प्रशमन करण्याचं सामर्थ्य ह्या मंत्रामध्ये आहे, सर्वबाधाप्रशमनं.

नंतर सर्व पापप्रशमनं, बाधा ज्या पापातून किंवा कोपातून उत्पन्न होतात त्यांचं प्रशमन. जे पाप आम्ही केलं, त्या पापामुळे जो प्रज्ञापराध झाला, त्यामुळे दोन्ही प्रकारच्या ह्या गोष्टी की ज्याच्यामधून सर्व बाधा उत्पन्न होत राहतात. त्या दोन्हीना प्रशमन करण्याचं कार्य म्हणजे सर्वबाधाप्रशमनं, सर्वपापप्रशमनं, सर्वकोपप्रशमनं. म्हणजेच कोण? तर अग्रगण्य सेनापती ज्याच्या हातामध्ये तीन हत्यारं आहेत, बाधा थांबवण्यासाठी, पाप नाहीसं करण्यासाठी आणि कोप थंडावण्यासाठी, एक बॅटरी, एक काठी आणि एक पिस्तूल.

असा हा अग्रगण्य सेनापती ह्या मंत्राच्या बरोबर आम्हाला प्राप्त होतो, ज्यावेळी हा संपूर्ण गुरुमंत्र म्हणतो तेव्हाच फक्त आणि त्यामुळे आमचं भविष्य सुद्धा सिक्युअर्ड होतं. ज्या भविष्याची आम्हाला खात्री नाही, मनात इन्सिक्युरीटी येत राहते पुढे काय होईल, पुढे काय होईल, पुढे काय होईल, पुढे काय होईल? अनेक वेळा तर असं दिसतं की सगळं चांगल चाललेलं आहे म्हणून मनुष्य जास्त दु:खी असतो.

सगळं चांगल चाललंय, असंच राहू दे बाबा, ह्यात काय बिघाड व्हायला नको, पुढे काय येईल माहीत नाही, ही जी भीती आहे ना ती भीतीसुद्धा दूर होऊ शकते, कशामुळे? ह्या मंत्राच्या उच्चारामुळे आणि हा जो अग्रगण्य सेनापती आहे तो पुढे जाऊन पुढचं जर काही वाईट घडणार असेल, तर तुमच्या-तुमच्या भक्तीच्या प्रमाणामध्ये पन्नास टक्के, तर तो प्रत्येकासाठी काम करणार आहे. तुमच्या-तुमच्या भक्तीच्या प्रमाणात तो पन्नासहून, पंच्चावन, पासष्ट, पंच्याहत्तर, पंच्याऐंशी, पंच्याण्णव, शंभर हे फक्त तुमच्या हातामध्ये. पन्नास टक्क्याची ग्वाही मी तुमची दिलेली आहे त्यामुळे आम्हाला ह्या ध्वजेच्या रूपाने आम्हाला गुरुमंत्राचा हा अग्रगण्य सेनापती मिळालेला आहे, जो आमच्या पुढे चालणारा आहे.

तुम्ही म्हणाल बापू! भविष्यकाळाच्या पुढे चालला हे आम्हाला समजलं, पण भूतकाळाच्या पुढे कसं चालणार? वर्तमानकाळाच्या पुढे आम्ही समजू शकतो, पण भूतकाळाच्या पुढे कसं काय? हो, हा भूतकाळाच्याही पुढे चालणार आहे.

सद्गुरु श्री अनिरुद्धांनी प्रवचनात ‘गुरुक्षेत्रम् मन्त्राचे श्रद्धावानाच्या जीवनातील महत्त्व’ याबाबत जे सांगितले, ते आपण या व्हिडिओत पाहू शकता

ll हरि: ॐ ll ll श्रीराम ll ll अंबज्ञ ll