गुरुक्षेत्रम् मन्त्राचे श्रद्धावानाच्या जीवनातील महत्त्व - भाग ४

सद्गुरू श्री श्रीअनिरुद्धांनी त्यांच्या ०८ एप्रिल २०१० च्या मराठी प्रवचनात ‘गुरुक्षेत्रम् मन्त्राचे श्रद्धावानाच्या जीवनातील महत्त्व’ याबाबत सांगितले.

ह्या मंत्रामध्ये हा जो बीजमंत्र आहे, बीजमंत्रामध्ये जो ‘ॐ ऐं ह्रीं क्लीं चामुण्डायै विच्चे’ हा जो मंत्र आहे, हा संपूर्ण मंत्र ही ह्या मंत्राची ध्वजा आहे. ‘ॐ ऐं ह्रीं क्लीं चामुण्डायै विच्चे’ हा जो मंत्र आहे, हा मंत्रच मुळी ह्या गुरुमंत्राची ध्वजा आहे, पताका आहे. ध्वज लावला जातो, तर ध्वजा म्हणजे काय? जी खांद्यावर घेऊन मिरवली जाते, ती ध्वजा आहे म्हणजे ध्वज नाही आहे, ध्वजा आहे.

तर हा जो मंत्र आहे - ‘ॐ ऐं ह्रीं क्लीं चामुण्डायै विच्चे’ ही ध्वजा आहे, ह्या संपूर्ण मंत्राची. म्हणजे एक मंत्रच, एक अतिशय सर्वश्रेष्ठ मंत्र ह्या मंत्राची ध्वजा बनली आहे लक्षात ठेवा, आलं लक्षामध्ये.

सैन्यामध्ये बघा, नेहमी आघाडीला ध्वज असतो आणि शेवटी एक वेगळा ध्वज असतो. हे दोन सगळ्यात उंच असतात, तर जो आघाडीला असतो त्याला ध्वजा म्हणतात आणि जो सगळ्यात पाठीमागे असतो त्याला पल्लव म्हणतात. मंत्रामध्ये सुद्धा मंत्राच्या आधी जे काही जोडलं जातं त्याला ध्वजा म्हणतात आणि मंत्रानंतर जे पालुपद जोडल जातं, त्याला पल्लव म्हणतात.

तर ह्या मंत्रामध्ये, ह्या गुरुमंत्रामध्ये ‘ॐ ऐं ह्रीं क्लीं चामुण्डायै विच्चे’ हा अत्यंत महन्मंगल मंत्र, कुठल्याही अशुभाचा नाश करण्याची ताकद असलेला मंत्र. हीच ध्वजा आहे आणि कशासाठी? तर सर्वेबाधाप्रशमनं, सर्वपापप्रशमनं, सर्वकोपप्रशमनं.

ये जो मंत्र है ये मंत्र, ये गुरुमंत्र जो है, इस मंत्र का ‘ॐ ऐं ह्रीं क्लीं चामुण्डायै विच्चे’ यह ध्वजा कहलाया जाता है। ध्वजा यानी सेना के आरंभ में, पहले में, शुरुआत में, अग्रमुख में जो ध्वजा रहती है, जिसके साथ जो सेनापती रहता है उस सेनापती के साथ जो ध्वज रहता है, फ्लॅग रहता है, thats call a ध्वजा और जो पीछे रहता है, उसे पल्लव कहते है। तो इस मंत्र की ध्वजा यानी इस मंत्र के अग्रणी सेनापति का काम करने का काम, कार्य करने का काम, कार्य करने का कार्य ये मंत्र करता है।

म्हणजेच प्रत्येक मनुष्याच्या जीवनामध्ये हा मंत्र उच्चारला जातो तेव्हा आपोआप हा जो मंत्र आहे ‘ॐ ऐं ह्रीं क्लीं चामुण्डायै विच्चे’ हा पूर्णपणे अशुभ आणि अशुंभकर यंत्रणा ह्या सर्वांचा नाश करणारा मंत्र हा त्याचा अग्रगण्य सेनापती आहे. अग्रगण्य सेनापती कसा असावा लागतो? तर जो येणार्‍या समोरच्या किती मोठ्या सैन्याला सहजपणे तोंड देऊ शकेल असा असावा लागतो आणि त्याच्या सैन्यासहित असतो. म्हणजे ह्याचा अर्थ काय की ‘ॐ ऐं ह्रीं क्लीं चामुण्डायै विच्चे’ हा ह्या गुरुमंत्राचा काय आहे, तर ध्वजा आहे.

सद्गुरु श्री अनिरुद्धांनी प्रवचनात ‘ ‘गुरुक्षेत्रम् मन्त्राचे श्रद्धावानाच्या जीवनातील महत्त्व’ याबाबत जे सांगितले, ते आपण या व्हिडिओत पाहू शकता

ll हरि: ॐ ll ll श्रीराम ll ll अंबज्ञ ll