गुरुक्षेत्रम् मन्त्राचे श्रद्धावानाच्या जीवनातील महत्त्व - भाग १०
सद्गुरू श्री श्रीअनिरुद्धांनी त्यांच्या ०८ एप्रिल २०१० च्या मराठी प्रवचनात ‘गुरुक्षेत्रम् मन्त्राचे श्रद्धावानाच्या जीवनातील महत्त्व’ याबाबत सांगितले.
आम्ही परमेश्वराची पूजा, जगातील बेस्ट मंत्रांनी म्हणतो आहोत, बेस्ट जगातील बेस्ट फुलं वाहतो आहोत, जगातलं बेस्ट जल वाहतो आहोत, जगातली बेस्ट म्हणजे सुगंध वाहतो जगातले, बेस्ट उदबत्या वाहतो आहोत- लावतो आहोत, बेस्ट दीप लावतो आहोत, बेस्ट सजावट केलेली आहे, त्याबरोबर आमचं मन पण बेस्ट आहे, आमचं शरीर पण बेस्ट आहे, आमची बुद्धी पण बेस्ट आहे, आलं लक्षामध्ये! असं जेव्हा घडेल ती बेस्ट स्थिती, आमची बेस्टेट स्थिती म्हणजे ‘विच्चे’ आणि हा मंत्र जेव्हा आम्ही गुरुमंत्रामध्ये घेतो तेव्हा त्याचा अर्थ मुळी काय होतो? की हे आम्हाला प्राप्त झालेला आहे.
एरव्ही हा मंत्र तुम्हाला स्वत:ला सिद्ध करायला पाहिजे ‘ॐ ऐं र्हीं क्लीं चामुण्डायै विच्चे’ त्यामधला ‘विच्चे’ चा सगळा अर्थ तुम्हाला प्राप्त करून घ्यायचा असेल, तर तुम्हाला मंत्र सिद्ध करायला पाहिजे. हा मंत्र जर सिद्ध करायचा तर मनुष्याला पूर्णपणे ब्रह्मचर्य पाळून म्हणजे पाचही यम-नियम पाळून, असत्य बोलायचं नाही, पूर्ण ब्रह्मचर्य पाळायचं, कसला परिग्रह करायचा नाही म्हणजे काही गोळा करायचं नाही वगैरे वगैरे वगैरे हे करून ह्याचा कमीतकमी छत्तीस कोटी जप करायला पाहिजे. तोसुद्धा कुठे? तर तीर्थक्षेत्री, कसा? तर भिक्षान्न मागून. भिक्षान्नसुद्धा मागायचं नाही, कोणी दिलं तर खायचं, मागायचं नाही, कोणी देईल त्यावरच राहायचं. अशा ह्याच्यात जेव्हा आम्ही किती कोटी जप करू ह्या मंत्राचा? छत्तीस कोटीचा तेव्हा हा मंत्र सिद्ध होईल.
ह्या गुरुमंत्रामुळे तो गुरुमंत्र म्हणून आम्हाला तो सिद्ध होऊन आलेला आहे, आलं लक्षामध्ये. म्हणून मी तुम्हाला गॅरेंटी देतो काय? की पन्नास टक्के ‘विच्चे’ डेफिनेटली आहे. तुमच्या आयुष्यामध्ये पन्नास टक्के ‘विच्चे’ ह्या मंत्राच्या स्वीकाराबरोबर आलंच. जोपर्यंत त्याचा हात सोडत नाही, तो तुमच्याकडे आहेच. अधिक वाढवणं तुम्हाला पूर्ण मुभा आहे आणि अधिकसुद्धा कशातून वाढणार आहे? तर ह्याच मंत्राच्या जपातून वाढणार आहे. ‘सर्वबाधाप्रशमनं श्रीगुरुक्षेत्रम्’ हा विश्वास झाला की हे वाढणार आहे. ‘सर्वपापप्रशमनं श्रीगुरुक्षेत्रम्’ हा विश्वास यायला हवा. ‘त्रिविक्रमनिलयं श्रीगुरुक्षेत्रम्’, हे त्रिविक्रमाचं निलय आहे म्हणजे अंतर्गृह आहे, हाच घर आहे आणि मी कुठे आहे? मला मंत्र मिळाला हा ह्याचा अर्थ मी कुठे राहतो आहे? आलयं मध्ये नाही, गृह मध्ये नाही तर निलयं मध्ये.
आपण रात्रीच्या प्रवचनमध्ये बघितलं होतं आणि एकदा मी मराठी प्रवचनामध्येही सांगितलं होतं की घराचे तीन भाग असतात. ‘आलय’ म्हणजे आल्या-गेल्यांना जिकडे बसायची जागा असते ते आलय. त्यानंतर गृह म्हणजे त्यातल्या त्यात थोडी जवळची माणसं येऊ शकतात ते. तर निलयं म्हणजे काय? जिकडे फक्त आप्त जवळचे आप्त ते जिथे येऊ शकतात, ती जागा म्हणजे निलयं.
‘निजसुखनिलया नेई गा।’ हेमाडपंतांनी केलेली प्रार्थना आहे. हेमाडपंतांनी काय मागितलं साईनाथांकडे? की ‘निजसुखनिलया नेई गा।’
हा मंत्र तुम्हाला त्या सद्गुरुच्या निलयं मध्ये घेऊन जाणारा आहे, आलं लक्षामध्ये, ‘त्रिविक्रमनिलयं श्रीगुरुक्षेत्रम्’.
सद्गुरु श्री अनिरुद्धांनी प्रवचनात ‘गुरुक्षेत्रम् मन्त्राचे श्रद्धावानाच्या जीवनातील महत्त्व’ याबाबत जे सांगितले, ते आपण या व्हिडिओत पाहू शकता.
ll हरि: ॐ ll ll श्रीराम ll ll अंबज्ञ ll