गुरुक्षेत्रम् मन्त्राचे श्रद्धावानाच्या जीवनातील महत्त्व

सद्गुरू श्री श्रीअनिरुद्धांनी त्यांच्या ८ एप्रिल २०१० च्या मराठी प्रवचनात ‘ गुरुक्षेत्रम् मन्त्राचे श्रद्धावानाच्या जीवनातील महत्त्व (The significance of Guru-kshetram mantra in Shraddhavan's life) ’ याबाबत सांगितले.

आता आपण पहिल्यांदा हा मंत्र (गुरुक्षेत्रम् मन्त्र) ऐकूया सीडीवरती, त्यानंतर मी परत ह्या मंत्राविषयी बोलणार आहे. हरि ॐ.

हरि ॐ. ह्या मंत्रामध्ये, ह्या मंत्रामधील प्रत्येक अक्षर वाक्य नव्हे, श्लोक नव्हे, वाक्य नव्हे, शब्द नव्हे तर प्रत्येक अक्षर अतिशय स्पंदन घेऊन प्रत्येकाच्या उच्चाराबरोबर नुसत्या उच्चाराबरोबरसुद्धा तीनही देहांमध्ये प्रवास करते आणि ज्या प्रमाणात विश्वास, ज्या प्रमाणात श्रद्धा, त्या प्रमाणात अधिक काम करणारच आहे.

म्हणजे श्रद्धा कितीही कमी असली, तरी पन्नास टक्के काम हा मंत्र करणारच आहे, नुसत्या उच्चाराबरोबर. म्हणजे तुम्हाला पासींग मार्कापेक्षा तरी सेकंड क्लास मिळतोच आहे.

पुढचे मार्क मिळवणं मात्र तुमच्या श्रद्धेवर, विश्वासावर आणि प्रयासांवर अवलंबून आहे, नुसत्या ह्याच्या उच्चाराने सुद्धा तुम्ही ह्या परीक्षेतले शंभर टक्के पन्नास मार्क, पन्नास टक्के मार्क जीवनाच्या परीक्षेतले पन्नास टक्के मार्क प्राप्त करून घेणार आहात.

सद्गुरु श्री अनिरुद्धांनी  प्रवचनात ‘गुरुक्षेत्रम् मन्त्राचे श्रद्धावानाच्या जीवनातील महत्त्व’ याबाबत जे सांगितले, ते आपण या व्हिडिओत पाहू शकता

 

ll हरि: ॐ ll ll श्रीराम ll ll अंबज्ञ ll