"श्रीललिता पंचमी" - श्रीमातृवात्सल्यविंदानम कथा (Shree Lalita Panchami - Matruvatsalyavindam Story)

ll हरि ॐ ll

श्रीललिता पंचमी - श्रीमातृवात्सल्यविंदानम कथा (Shree Lalita Panchami - Matruvatsalyavindam Story)
 
श्रीललिता पंचमी
बापूंच्या घरातील मोठी आई
श्विन शुद्ध पंचमी म्हणजेच श्रीललिता पंचमी. आदिमाता महिषासुरमर्दिनीने रामास दिलेला वर, म्हणजेच रावणाचा वध हे कार्य पूर्ण करण्याच्या आड येणार्‍या दुर्गमाचा वध करण्यासाठी रामसेनेच्या ठिकाणी ती आश्विन शुद्ध पंचमीच्या रात्रीस प्रगटली व तिने तिच्या परशुने त्या काकरूपी असुराचा म्हणजेच दुर्गमाचा वध केला. ह्या काकासुराचा अर्थात दैत्यराज दुर्गमाचा वध होताच आदिमाता महिषासुरमर्दिनीने तिच्या ह्या लीलेचे वृत्त श्रीरामास कळविण्यास व राम-रावण युद्धाचे पुढील वृत्त जानकीस वेळच्या वेळी कळविण्यासाठी आपल्या लाडक्या कन्येस - आह्लादिनीस "लीलाग्रही" अर्थात "ललिता" रूपाने तेथे पाचारण केले.
 
ही संपूर्ण कथा श्रीमातृवात्सल्यविंदानमच्या सत्तावीसाव्या अध्यायामध्ये येते. ललिता पंचमीचे महत्त्व सांगणार्‍या या अध्यायात श्रीआदिमातेचे अशुभनाशिनी स्तवनही येते. ह्या स्तवनामध्ये सर्व श्रद्धावान भक्तांना मार्गदर्शक ठरणारी बिभीषणाची प्रार्थना आहे:
 
पापोऽहं पापकर्माऽहं पापात्मा पापसंभव:।
त्राहि मां आदिमाते सर्वपापहरा भव॥
Aniruddha, Sadguru Aniruddha, Bapu, Sai, Chamunda, devi, श्रीललिता पंचमी
घरातील मोठ्या आईचे दर्शन घेताना नंदाई