बापूंच्या आगमनाने श्रद्धावानांना पुन्हा प्रवचनांचा नित्य आनंद ( Shraddhavans enjoying Bapu's presence during Pravachan)

Shraddhavans enjoying Bapu's presence during Pravachan
बापू
ज दसरा. आज विजयोपासनेला बापू स्वत: श्रीहरिगुरुग्राम येथे हजर असतील व सर्व श्रद्धावानांना बापूंच्या दर्शनाचा लाभ होईल.
माझ्या सर्व मित्रांना दसर्‍याच्या हार्दिक शुभेच्छा. दसर्‍याच्या निमित्ताने प्रत्येक श्रद्धावानाचा सद्‌गुरु चरणी "विश्वास" दृढ व्हावा हीच सदगुरु बापूचरणी प्रार्थना.
बापू
या आश्र्विन नवरात्रीमध्ये आपण अनेक गोष्टी घडताना बघितल्या. या नवरात्रीच्या पहिल्या दिवशी, म्हणजेच प्रतिपदेला पहाटे श्रीअनिरुद्ध गुरुक्षेत्रम येथे श्रीशिवगंगागौरीच्या स्नानाचा सोहळा होवून नवरात्रीला सुरुवात झाली. अनेक श्रद्धावान या नवरात्रीच्या काळामध्ये श्रीअनिरुद्ध गुरुक्षेत्रम व जुईनगर येथे दर्शनासाठी आले. या नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी, श्रद्धावान आतुरतेने वाट बघत असलेल्या 'पिपासा', 'पिपासा २' व 'पिपासा पसरली' ह्या सीडीजचे पुन:प्रकाशन झाले. तसेच श्रीआंजनेय प्रकाशनची अधिकृत ई-कॉमर्स वेबसाईट www.aanjaneyapublications.comसुरु करण्यात आली. ह्या नववरात्रीच्याच काळात, म्हणजे शनिवार दि. २० ऒक्टोबर रोजी श्रीअनिरुद्ध चलिसा अखंड पठणाचा कार्यक्रम अतिशय भक्तिपूर्ण वातावरणात श्रीहरिगुरुग्राम येथे पार पडला. त्याचप्रमाणे नवरात्रीच्या काळामध्ये सप्तमीच्या दिवशी बापूंच्या घरी श्रीपरांबा पूजन संपन्न झाले.
आज दसर्‍याच्या दिवशी सकाळी आपण बापूंनी लिहीलेली दोन पुस्तके; "आवाहनम न जानामि" व "तदात्मानं सृजाम्यहम" पुर्नप्रकाशित केली व आज सर्व श्रद्धावानांसाठी ती उपलब्ध आहेत. ही पुस्तके लवकरच श्रीआंजनेय प्रकाशनच्या अधिकृत ई-कॉमर्स वेबसाईटवर (www.aanjaneyapublications.com) उपलब्ध होतील.
आजपासून बापू गुरुवारीही श्रीहरिगुरुग्रामला यायला सुरुवात करतील. त्यामुळे सर्व श्रद्धावानांना पुन्हा एकदा बापूंच्या प्रवचनाचा आनंद नित्य घेता येईल..