क्रमबध्दता - भाग २ (Sequence - Part 2)

सद्गुरू श्री अनिरुद्धांनी त्यांच्या २० जून २०१३ च्या मराठी प्रवचनात ‘क्रमबध्दता - भाग २ (Sequence - Part 2)’ याबाबत सांगितले.

सद्गुरू श्री श्रीअनिरुद्धांनी त्यांच्या २० जून २०१३ च्या मराठी प्रवचनात ‘क्रमबध्दता - भाग २ (Sequence - Part 2)’ याबाबत सांगितले.

ब्रह्माण्डाभोवते वेढे वज्रपुच्छे करू शके। तयासी तुळणा कैचि ब्रह्माण्डी पाहता नसे।।’ की ब्रह्मांडामध्ये हनुमंताला तुलना कोणाशी देता येत नाही. कारण हा महाप्राण असल्यामुळे हा प्रत्येक गोष्टीतला क्रम हाच डिसाईड करतो, हाच निश्चित क्रम.

महाप्राणाच्या व्याख्या आपण बघितलेल्या आहेत. महाप्राण निर्जीव वस्तूंमध्ये काय काम करतो? महाप्राण निर्जीव वस्तूमध्ये पण आहे, दगडामध्ये पण आहे, लाकडामध्ये पण आहे त्यांची स्थिती मेंटेन करण्याच, जसं आहे तसं आहेपणा मेंटेन करण्याचं. प्रोटॉन इलेक्ट्रॉन मधला फोर्स कायम ठेवण्याचं, इलेक्ट्रॉनला कायम फिरत ठेवण्याचं बरोबर, ते महाप्राणाच काम आहे. तर मनुष्य मात्र कसं काम करतो. त्याचा अभ्युदय घडवण्यासाठी, त्याचा विकास करण्यासाठी, त्याला मार्गदर्शन करण्याच त्याला बळ पुरवण्याच, बरोबर! आणि विकास हा मनुष्याचा काय आहे? क्रमबद्धतेनेच होतो.

असं झालय का आईच्या पोटामध्ये बाळ पहिल्या दिवशी नऊ महिन्याच होत, दुसर्‍या दिवशी नऊ महिने आठ महिने, एकोणतीस दिवसाच होतं असा उलटा प्रवास कधी बघितलाय का? नाही. क्रम ठरलेला आहे बरोबर, पटतय. रक्त आधी हृदयातून फुफ्फुसामध्ये जाणार, शुद्ध होऊन मगच पुढे जाणार हा क्रम ठेरलेला आहे, पटतय.

जेवायच तोंडानेच दुसरी कडून जेवता येईल का? नाही, पटतय. लाजायच कारण नाही सत्य आहे वास्तच आहे आपला अभ्यास करायचा आहे, बरोबर. हा क्रम सगळा कोणाकडून ठरवला जातो? महाप्राणाकडून ठरवला जातो सृष्टीच्या. मग हा काय आहे? हा क्रमनियंता आहे. हा कोण आहे? महाप्राणतेचा क्रमनियंता आहे, क्रमनियंता. त्यामुळे ह्या एका महाप्राणामध्ये ह्या दोन्ही गोष्टी कशा आहेत? समानपणे आहेत, प्राणतत्त्व आणि क्रमनियंता.

मग हे त्याचे दोन्ही गुणधर्म त्याचं सूर्यत्व आणि त्याचं चंद्रत्व म्हणून तो एकमेव असा आहे जो सूर्य ही आहे आणि जो चंद्र ही आहे, जो सूर्य ही आहे आणि चंद्र ही आहे ओ.के. त्याला म्हणतात हठयोग, हठयोग, काय म्हणतात? राजयोग, आणि हठयोग दोन शब्द आपण वापरतो ह आणि ठ. ह म्हणजे सूर्य आणि ठ म्हणजे चंद्र. ह्या दोघांच बॅलन्स शरीरामध्ये उत्पन्न करणं, मनामध्ये उत्पन्न करणं, प्राणतत्त्वामध्ये उत्पन्न करणं म्हणजे हठयोग. पण आपण काय समजतो की हठ म्हणजे हट्टीलोकाचा योग. म्हणजे अतिशय कडक साधना करायची, काय ती वाटेल ती आसन करायची आणि शरीरावर अत्याचार करायचे म्हणजे हठयोग नाही. हठयोग म्हणजे सूर्य-चंद्रांच एकरुपत्व, आलं ल़क्षामध्ये.

सद्गुरु श्रीअनिरुद्धांनी प्रवचनात ‘क्रमबध्दता - भाग २ (Sequence - Part 2)' बाबत जे सांगितले, ते आपण या व्हिडिओत पाहू शकता

॥ हरि ॐ ॥ ॥ श्रीराम ॥ ॥ अंबज्ञ ॥